Crop Insurance Agrown
ॲग्रो विशेष

Crop Insurance : एक लाख ९० हजार शेतकऱ्यांना अखेर मिळाला ११३ कोटींचा अग्रिम

Advance Crop Insurance : मागच्या वर्षीच्या खरीप हंगामातील (२०२३) पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना विमा कंपनीने २५ टक्के अग्रिम द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमा कंपनीला दिले होते.

Team Agrowon

Solapur News : मागच्या वर्षीच्या खरीप हंगामातील (२०२३) पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना विमा कंपनीने २५ टक्के अग्रिम द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमा कंपनीला दिले होते. पण कंपनीकडून दाद मिळत नव्हती, जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केलेल्या सातत्यच्या पाठपुरावाला अखेर यश आले असून, अखेरीस संबंधित विमा कंपनीने बाजरी, मका व सोयाबीनसाठी एक लाख ९० हजार ४५८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ११३ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी थेट जमा केला आहे.

पंतप्रधान पीकविमा योजना खरीप-२०२३ मध्ये जिल्ह्यातील सहा लाख ७६ हजार ३११ शेतकऱ्यांनी पाच लाख २३ हजार १७७ हेक्टर क्षेत्रासाठी ओरिएंटल विमा कंपनीकडे पीकविमा भरला होता. खरीप हंगाम २०२३ अंतर्गत प्रतिकूल परिस्थितीच्या अनुषंगाने अधिसूचित सर्व पिकांसाठी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी अधिसूचना निर्गमित करून २५ टक्के अग्रिम परतावा देण्याबाबत पीकविमा कंपनीस आदेशित केले होते. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या मागणीला यश आले आहे.

मूग, उडीद बाजरीची भरपाईही मिळणार

जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने ६५ हजार ९१८ शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्या होत्या. त्यापैकी ५९ हजार ११० शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करून, त्यापैकी २५ हजार ९५४ पात्र शेतकऱ्यांना रक्कम रुपये २४.९५ कोटी रुपये निधी वितरित करण्याची कार्यवाही पीकविमा कंपनीमार्फत सुरू आहे. तसेच काढणीपश्चात नुकसानीअंतर्गत २१ हजार ३८४ पूर्वसूचनापैकी १४ हजार ४५४ पंचनामे पूर्ण झाले असून, या शेतकऱ्यांची भरपाईची परिगणना करण्याची कार्यवाही पीकविमा कंपनीस्तरावर सुरू आहे.

तसेच पीक कापणी प्रयोगातील उत्पादनाच्या आधारे अंदाजे १ लाख ८० हजार शेतकऱ्यांना रक्कम रुपये ७०.४७ कोटी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. परंतु हंगामामध्ये प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसानीच्या वैयक्तीक पूर्वसूचनेतील लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश असल्याने वैयक्तिक पंचनाम्यातील शेतकऱ्यांचा निधी वितरित केल्यानंतर उर्वरित देय रक्कम पीक कापणी प्रयोगातील उत्पादनाच्या आधारे अदा करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मूग, उडीद व बाजरी या पिकांचा समावेश असल्याची माहिती पीकविमा कंपनीने दिली असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. गावसाने यांनी सांगितले.

तालुकानिहाय मिळालेली रक्कम आणि कंसात शेतकरी संख्या

अक्कलकोट ः १२ कोटी ४९ लाख ८५ हजार रुपये (२१ हजार ८८५), बार्शी ः ५९ कोटी २१ लाख ३२ हजार (८८ हजार ४०२), करमाळा ः ८६ लाख ८४ हजार (५९५९), माढा ः २७ लाख २८ हजार (२६७१), माळशिरस ः १ कोटी ६२ लाख २६ हजार (८०९१), मंगळवेढा ः २६ कोटी ९ लाख ११ हजार (१०,१०६), मोहोळ ः ७ कोटी ८ लाख ३१ हजार (११,७४१), पंढरपूर ः ८ लाख ८० हजार (८२१), सांगोला ः ४ कोटी ३७ लाख २१ हजार (१४.२४८), उत्तर सोलापूर ः १३ कोटी ८६ लाख ८८ हजार (१५, ६२७), दक्षिण सोलापूर ः ११ कोटी १३ लाख ८२ हजार (१०.९७९).

सोयाबीन अग्रिमबाबत विमा कंपनीने विभागीय आयुक्त यांच्याकडे दाखल केलेल्या अपिलातील सर्व मुद्दे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी यापूर्वीच खोडून काढलेले होते. या सर्व बाबींमुळे व प्रशासनाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ओरिएंटल पीकविमा कंपनीस शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम देणे अनिवार्य झाले होते. त्यामुळे हा प्रश्न सुटला.
दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT