Pre-Monsoon Regional Review Meeting : नैसर्गिक आपत्ती, पुरामुळे जीवित हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी

Divisional Commissioner Madhukar Raje Ardad : नैसर्गिक आपत्ती किंवा पुरामुळे जीवित व वित्तीय हानी होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी दिले.
Review Meeting
Review MeetingAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : यावर्षी मॉन्सूनचे लवकर आगमन होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. यापूर्वीच काही भागातील अतिवृष्टी व पूरपरिस्थिती लक्षात घेता यावर्षी नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा. नैसर्गिक आपत्ती किंवा पुरामुळे जीवित व वित्तीय हानी होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी दिले.

छत्रपती संभाजीनगर विभाग मॉन्सून पूर्व तयारीबाबत आढावा बैठक विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. २०) विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली. यावेळी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, बीड जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत, लातूर जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे,

Review Meeting
Monsoon Rain : राज्यात पावसाचे वातावरण कायम; देशातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम

धाराशिव जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख हे संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथून दूरदृष्य प्रणालीव्दारे उपस्थित होते. तर छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, कर्नल ऋषिकेश सूर्यवंशी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, उपायुक्त जगदीश मिनीयार, नयना बोंदार्डे, सुरेश वेदमुथा, ॲलीस पोरे, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्यासह प्रादेशिक विभागप्रमुख बैठकीला उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री अर्दड म्हणाले, की पावसाळ्यात काही गावांचा संपर्क तुटतो. त्यादृष्टीने नागरिकांची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था तसेच धान्य, औषधसाठा आदी सामुग्रीबाबत नियोजनपूर्वक व्यवस्था करावी. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरू नयेत यासाठी जलस्त्रोतांची गुणवत्ता तपासण्याबरोबरच आवश्यक तिथे पर्यायी व्यवस्था करावी. अवकाळी पावसानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ‘महावितरण’ने तत्परतेने नियोजन करावे.

Review Meeting
Kolhapur Rain : कोल्हापुरात वळवाच्या पावसाने भाजीपाला, आंबा बागांना फटका

जिल्हा व तालुकास्तरावर असलेला नियंत्रण कक्ष २४×७ नेहमी कार्यान्वित ठेवावा. आपत्ती काळात त्वरित संपर्क करण्यासाठी विविध आवश्यक विभागांचे आणि संपर्क यंत्रणांचे संपर्क क्रमांक अद्ययावत ठेवावेत, तसेच हे क्रमांक नेहमी सक्रिय असतील याची दक्षता घ्यावी. एसडीआरएफ तसेच एनडीआरएफची बचाव पथके स्थापन करुन आवश्यक साहित्यानिशी सुसज्ज ठेवा, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.

विजेला अटकाव करणारी यंत्र सुस्थितीत असावी. नादुरुस्त स्थितीत असलेली वीज अटकाव यंत्र तत्काळ दुरुस्त करून घेण्यासोबतच जिल्हानिहाय या यंत्रणेत प्रत्येक वर्षी १०० ने वाढ करावी. महानगरात असलेले मोठे नाले, नदी यावर ये-जा करण्यासाठी असलेला लोखंडी मार्ग चांगला आहे किंवा कसे याबाबत तपासणी करावी, आवश्यकता असेल तिथे तातडीने बदल करावा, अशा सूचनाही विभागीय आयुक्त श्री अर्दड यांनी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com