Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : पावणेदोन लाखावर शेतकरी थकबाकीदार

Kharif Season : जिल्ह्यात यंदा राष्ट्रीयीकृत बॅंकांद्वारे १२०४ कोटी रुपयांचे कर्ज वितरण होणार आहे. परंतु गेल्या हंगामातील कर्जाची परतफेड पावणेदोन लाखावर शेतकऱ्यांनी केली नाही.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News : जिल्ह्यातील तब्बल पावणेदोन लाख शेतकऱ्यांना कर्जाचा भरणा करणे शक्‍य झालेले नाही. परिणामी, हे शेतकरी थकित ठरल्याने त्यांचा काळ्या यादीत समावेश करण्यात आला आहे. येत्या हंगामात त्यांना कर्जही मिळणार नसल्याने पैसा उभा करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

जिल्ह्यात यंदा राष्ट्रीयीकृत बॅंकांद्वारे १२०४ कोटी रुपयांचे कर्ज वितरण होणार आहे. परंतु गेल्या हंगामातील कर्जाची परतफेड पावणेदोन लाखावर शेतकऱ्यांनी केली नाही. परिणामी, येत्या हंगामात या शेतकऱ्यांना कर्ज कसे देणार, असा प्रश्‍न आहे.

जिल्ह्यातील २६ राष्ट्रीयीकृत आणि खासगी बॅंकांकडे १ लाख ८२ हजार शेतकऱ्यांचे १८५५ कोटी रुपये थकित आहेत. कर्जाची परतफेड न केल्याने बॅंकांनी शेतकऱ्यांना नोटीस बजावली आहे. यातील १४७७ कोटी रुपयांचे कर्ज शेतीसाठी घेण्यात आले आहे.

उर्वरित ३७८ कोटी रुपयांचे कर्ज हे दीर्घमुदत प्रकारातील आहे. एकूणच १ लाख ८५ हजार शेतकऱ्यांना विविध कारणांमुळे पीककर्जाचा भरणा करता आला नाही. परिणामी, हे पावणेदोन लाखावर शेतकरी थकित कर्जदार ठरले आहेत. या शेतकऱ्यांचे खाते ‘एनपीए’मध्ये गेल्यामुळे त्यांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.

त्यानंतरही कर्जाचा भरणा न केल्यामुळे ते थकबाकीदार ठरले. त्यांना आता खरिपासाठी कर्ज मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता पैशाच्या उपलब्धतेसाठी खासगी व्यक्‍तींकडे धाव घ्यावी लागण्याची शक्यता आहे.

पीककर्ज वितरणास विलंब

सेवा सोसायट्यांमार्फत जिल्हा बॅंकेचे कर्ज वितरण होते. त्यासाठी या सोसायट्यांना ठराविक कमिशन दिले जाते. थकित कर्जाची वसुली केल्यास त्यावर अतिरिक्‍त कमिशन देण्याची व्यवस्था आहे. परंतु जिल्ह्यात सोसायट्यांमार्फत दिलेल्या कर्जाची वसुली रखडली होती. त्यामुळे यंदा सोसायट्यांमार्फत कर्जच न देण्याचा निर्णय जिल्हा बॅंकेकडून घेण्यात आला होता. त्यामुळे देखील कर्ज वितरणास विलंब झाला आहे.

आठ टक्‍के कर्ज वितरण

राष्ट्रीयीकृत बॅंकांनी कर्ज भरणा करण्यास ३० जून पर्यंतची मुदत दिली आहे. सद्यःस्थितीत खरिपासाठी ९९ कोटी ७५ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. उद्दिष्टाच्या ते अवघे आठ टक्‍के आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT