Crop Loan Distribution : तीन हजार कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

Agriculture Loan Update : सरलेल्या आर्थिक वर्षात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय घेत मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केले.
Agriculture Loan
Agriculture LoanAgrowon

Latur News : सरलेल्या आर्थिक वर्षात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय घेत मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केले. त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा अपवाद सोडला तर अन्य बँकांनी आखडता हात घेऊनही कर्ज वाटपाचे जिल्ह्याचे उद्दिष्ट इतिहासात पहिल्यांदाच ओलांडले गेले व उद्दिष्टाच्या ११५ टक्के वाटप झाले.

Agriculture Loan
Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

गेल्यावर्षी बँकांनी दिलेला प्रतिसाद लक्षात घेता यंदा कर्ज वाटपाच्या उद्दिष्टात दोनशे कोटीचे वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सव्वाचार लाख शेतकऱ्यांना या कर्जाचा लाभ देण्याचे नियोजन आहे. लोकसभा निवडणुकीमुळे पीक कर्जाच्या वार्षिक आराखड्याला जिल्हा बँकर्स समितीची मंजुरी मिळाली नसली तरी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा अग्रणी बँकेने सर्व बँकांना कळवून खरिपाचे कर्ज वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार बँकांनी कर्ज वाटप सुरू केल्याची माहिती अग्रणी बँकेच्या सूत्रांनी दिली. गेल्यावर्षी खरीप हंगामात दोन हजार २३९ कोटी तर रब्बी हंगामात ५६० कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. जिल्ह्यात खरीपामध्येच मोठ्या प्रमाणात कर्जाचे वाटप करण्यात येते. त्या तुलनेत रब्बी हंगामात कर्ज वाटपाचा टक्का कमी आहे. खरीप हंगामात जिल्हा बँकेने उद्दिष्टाच्या दुपटीने कर्ज वाटप केले तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेनेही उद्दिष्टाच्या ११२ टक्के वाटप केले.

Agriculture Loan
Kharif Crop Loan : खरीप हंगामासाठी एप्रिलमध्ये २५ टक्के पीककर्ज वाटप

राष्ट्रीयकृत व अन्य बँका दरवर्षी प्रमाणे उद्दिष्टापर्यंत पोहचल्या नाहीत. तरीही जिल्हा बँकेच्या विक्रमी कर्ज वाटपामुळे जिल्ह्याचे उद्दिष्ट ओलांडून अन्य बँकांचे घोडे गंगेत वाहून गेले. या स्थितीत वार्षिक नियोजनात यंदा कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दोनशे कोटीने वाढवण्यात आले आहे. यात जिल्हा बँकेला एक हजार ११ कोटी, भारतीय स्टेट बँकेला ६२९ तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेला २९२ कोटीचे उद्दिष्ट देण्यात आहे.

गेल्या वर्षीतील पीक कर्ज वाटप

पीककर्जाचे एकूण उद्दिष्ट - २७९९ कोटी

प्रत्यक्षात वाटप - २५६५ कोटी (उद्दिष्टाच्या ११५ टक्के)

लाभार्थी शेतकरी - दोन लाख ८८ हजार ९५०

जिल्हा बँकेचे वाटप - १७३७ कोटी (उद्दिष्टाच्या २१८ टक्के)

लाभार्थी शेतकरी - दोन लाख १९ हजार ५०

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे वाटप - २६७ कोटी (११२ टक्के)

लाभार्थी शेतकरी - २५ हजार २४३

भारतीय स्टेट बँकेचे वाटप ३०६ कोटी (६३ टक्के)

लाभार्थी शेतकरी - २६ हजार १७७

उर्वरित बँकांचे वाटप - २५५ कोटी (१२ टक्के)

लाभार्थी शेतकरी - १८ हजार ४८०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com