Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Chemical Fertilizers : खरिपासाठी पावणेदोन लाख टन रासायनिक खते संरक्षित

Kharif Season 2024 : दीड लाख टन युरियाचा समावेश; संरक्षित साठा वाढविण्याची मागणी

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Fertilizer Use : पुणे ः खरीप हंगामातील खतपुरवठ्यात आपत्कालीन स्थिती उद्‍भवल्यास यंदाचा संरक्षित साठा (बफर स्टॉक) पावणेदोन लाख टनाचा जाहीर झाला आहे. मात्र यंदा मॉन्सून चांगला बरसण्याचा अंदाज असल्यामुळे संरक्षित साठा अपुरा पडण्याची भीती निविष्ठा उद्योगाने व्यक्त केली आहे.
खरिपासाठी खत वितरणाचे जिल्हानिहाय नियोजन कृषी विभागाकडून होते. परंतु अनेकदा पुरवठ्यात अडचणी येतात. त्यातून एखाद्या जिल्ह्यात टंचाईची स्थिती उद्भवते. त्यामुळे असंतोष वाढून आंदोलनेही होतात.

अशावेळी हाती संरक्षित साठा (बफर स्टॉक) असल्यास काही प्रमाणात त्वरित खत पुरवठा करणे शक्य होते. त्यामुळे तणावाची परिस्थिती निवळण्यास मदत होते. याकरिता कृषी विभागाकडून हंगामाच्या आधीच खतांचा संरक्षित साठा जाहीर केला जातो.
कृषी विभागातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, यंदाच्या संरक्षित साठ्यात दीड लाख टन युरिया असेल. तसेच २५ हजार टन डीएपीदेखील असेल. खरिपात पेरणीच्या वेळी तसेच उभ्या पिकांना खतांची दुसरी मात्रा देण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग होते. याच कालावधीत टंचाई तयार झाल्यास संरक्षित साठ्यातील खतांचा पुरवठा उपयुक्त ठरणार आहे. यंदाचा संरक्षित साठा पुरेसा राहील, असाही विश्‍वास कृषी विभागाला वाटतो. कारण यंदा १३.७३ लाख टन युरिया व पाच लाख टन डीएपीचे दाणेदार खत राज्यभर वाटले जाईल. याशिवाय नॅनो युरियाच्या २० लाख बाटल्या व नॅनो डीएपीच्या १० लाख बाटल्या उपलब्ध असतील. त्यामुळे संरक्षित साठ्यावर ताण येणार नाही, असे गुणनियंत्रण विभागाचे म्हणणे आहे.

युरिया व डीएपीव्यतिरिक्त संयुक्त खतांना मागणी असते. यंदा चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे खतांना उचल राहील, असे खत विक्रेत्यांना वाटते. ‘‘मॉन्सून वेळेवर व पुरेसा राहिल्यास यंदा राज्यात खताला भरपूर मागणी राहील. वेळेत व पुरेशी खते सर्वत्र उपलब्ध न झाल्यास संरक्षित साठ्यामधील खते वाटावी लागतील. त्यामुळे संरक्षित साठे पुरेसे नसल्यास कृषी विभागाची कसरत होईल,’’ असे खत विक्रेत्यांच्या संघटनेमधील विदर्भातील एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
एका खानदेशातील एका खत विक्रेत्याने सांगितले, की संरक्षित साठा भरपूर असायला हवा. तो वेळेत वाटला तरच या संकल्पनेचा उपयोग होतो. अन्यथा, संरक्षित साठा पडून राहतो आणि त्यानंतर तो जबरदस्तीने विक्रेत्यांच्या गळ्यात मारण्याची वेळ कंपन्यांवर येते. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, यंदा युरिया, डीएपीसह दीड लाख टन एमओपी १८ लाख टन संयुक्त खते आणि साडेसात लाख टन सिंगल सुपर फॉस्फेट असा एकूण ४५.५३ लाख टन खतांचा पुरवठा राज्यभर होणार आहे. मागील तीन वर्षांचा सरासरी वापर पाहिल्यास यंदाच्या खरिपात होणारा पुरवठा चांगला आहे. त्यामुळे टंचाईचा प्रश्‍न उद्‍भवणार नाही.


खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच रासायनिक खतांचा साठा संरक्षित करण्याची बाब चांगली आहे. परंतु यंदा इतक्या कमी साठ्याचा उपयोग होणार नाही. जिल्हानिहाय वेळेत व पुरेसा साठा ठेवला गेला तरच आपत्कालीन स्थितीत ‘बफर स्टॉक’चे धोरण उपयुक्त ठरेल.
- विनोद तराळ पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्‍स, सीड्‍स डीलर्स असोसिशनने (माफदा)

राज्यात सध्या डीएपी व संयुक्त खतांच्या काही ग्रेडसचा पुरवठा कमी आहे. या ग्रेडस् कमी अनुदानामुळे विकणे परवडत नाही. त्यातून पुरवठ्याचे प्रश्‍न उद्‍भवतात. शासनस्तरावर या समस्येचा अभ्यास झाला पाहिजे. त्यामुळे ऐन खरिपात संरक्षित साठा किंवा नियमित खतपुरवठ्याच्या नियोजनातील अडथळे टाळता येतील.
- राजकुमार धुरगुडे पाटील, अध्यक्ष, अॅग्रो इनपुट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एम)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

Maharashtra Assembly Election Result 2024 : ‘ते’ पुन्हा आले!

Vidhansabha Election 2024 : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महायुतीचाच प्रभाव

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT