Skill Development Agrowon
ॲग्रो विशेष

Skill Development : राज्यात शंभर कौशल्य विकास केंद्रे स्थापन होणार

Team Agrowon

Pune News : राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नावीन्यतामंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नांतून कौशल्य संपन्न महाराष्ट्राच्या दिशेने सरकारने नवीन वर्षात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. १५ ते ४५ वयोगटांतील व्यक्तींना रोजगारक्षम बनविण्यासाठी कौशल्य विकास सोसायटीमार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहेत. याद्वारे महाराष्ट्रातील १०० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरू केली जाणार आहेत.

कौशल्य विकास ग्रामीण भागात केंद्रित असावा, हे कॅबिनेट मंत्री लोढा यांचे उद्दिष्ट होते. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतात प्रथमच ५११ कौशल्य विकास केंद्रांचे एकाच वेळी उद्‌घाटन करण्यात आले.

या कौशल्य विकास केंद्रांमार्फत गावातील नागरिकांना रोजगार कमावण्याची, नवे कौशल्य शिकण्याची समान संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जेणेकरून रोजगारासाठी गावातून शहराकडे होणारे स्थलांतर कमी होईल. त्याचप्रमाणे आता येत्या नवीन वर्षात सुद्धा सुरू होणाऱ्या १०० कौशल्य विकास केंद्रांमुळे महाराष्ट्राची कौशल्य संपन्न पिढी तयार करणे अधिक जलद गतीने होणार आहे.

या केंद्रांद्वारे रोजगारासाठी आवश्यक अभ्यासक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य महाविद्यालयांचे असेल आणि हे अभ्यासक्रम नॅशनल स्किल क्यूलिफिकेशन फ्रेमवर्कशी सुसंगत असतील. त्यासाठी केंद्र शासनातर्फे निश्चित केलेल्या कॉमन कॉस्ट नॉर्म्सनुसार प्रशिक्षण शुल्क देण्यात येईल.

कौशल्य विकास प्रशिक्षण हा भारतातील युवकांच्या जीवनात नवी पहाट आणेल. विकसित भारत घडवण्यात या प्रशिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका राहील. त्या दृष्टीने कौशल्य केंद्रांचे निर्माण कार्य आणि आपल्या तरुण पिढीला रोजगारक्षम बनवण्यासाठी तरुण पिढीला कौशल्य प्रशिक्षणाकडे वळवणे अतिशय महत्त्वाचे राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : हमीभावाने १३ लाख टन सोयाबीनची खरेदी होणार 

Sugarcane Season : महाराष्ट्र आणि कर्नाटकचा ऊस गाळप हंगाम एकावेळी, उसाची पळवापळवी थांबणार!

Ration Grain : ई-केवायसी नसल्यास एक नोव्हेंबरपासून रेशन बंद

Kolhapur market committee : कोल्हापूरच्या बाजार समितीत डुक्कर आणि चोरांनी केलं बेजार, आळा घालण्याची मागणी

Cold Storage Facility : जतला शीतगृह, अन्यत्र पायाभूत सुविधा देणार

SCROLL FOR NEXT