Skill Development : जिल्ह्यात २४ ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे

Rural Skill Development Center : पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन; जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
Collector Interacted with Students
Collector Interacted with StudentsAgrowon
Published on
Updated on

Solapur News : ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे, तसेच ग्रामीण भागातील युवक व युवतींना स्थानिक पातळीवरील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, याकरिता जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतींसह राज्यातील एकूण ५११ ग्रामपंचायतींमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र कार्यक्रम सुरू करण्यात आला असून, त्या केंद्रांचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले.

जिल्ह्यात २४ ठिकाणी ही केंद्रे स्थापण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी मंद्रूप येथील शासकीय आयटीआयमध्ये आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती लावली. तसेच येथे विद्यार्थ्यांशी संवादही साधला.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अप्पर तहसीलदार राजकुमार लिंभारे, पोलिस निरीक्षक प्रशांत घुले, आयटीआयच्या प्राचार्य करुणा कठारे, मनोज देशमुख यांच्या सह आयटीआयचे व जे. डी. पाटील संस्थेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रामध्ये प्रशिक्षण घेऊ इच्छणाऱ्या उमेदवारांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण केंद्रामध्ये दहावी, बारावी, पदवी, डिप्लोमा धारक यांना प्रशिक्षण मिळणार आहे.

Collector Interacted with Students
Kalammawadi Dam : काळम्मावाडी धरणाच्या गळतीचा प्रश्न मिटणार, ८० कोटींचा निधी मंजूर

या २४ गावांत होणार केंद्रे

जिल्ह्यात २४ ठिकाणी प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यात अक्कलकोट तालुक्यामध्ये नागणसूर, जेऊर, बार्शी तालुक्यामध्ये पांगरी, मळेगांव, करमाळा तालुक्यामध्ये जेऊर, वांगी, माढा तालुक्यामध्ये टेंभूर्णी, मोडनिंब,

माळशिरस तालुक्यामध्ये यशवंतनगर, माळीनगर, खंडाळी, मंगळवेढा तालुक्यामध्ये संत दामाजीनगर, भोसे, मोहोळ तालुक्यामध्ये कुरूल, पेनूर, पंढरपूर तालुक्यामध्ये करकंब, कासेगांव, टाकळी (ल), सांगोला तालुक्यामध्ये महूद बु, कोळा, उत्तर सोलापुर तालुक्यामध्ये नान्नज, दारफळ (बीबी), दक्षिण सोलापुर तालुक्यामध्ये कुंभारी, मंद्रुप या गावांचा समावेश आहे.

Collector Interacted with Students
Soybean, Cotton Rate : सोयाबीन, कापूस दरवाढीकडे शेतकऱ्यांच्या नजरा

विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगार सुरू करावा

शासकीय अथवा खासगी नोकरी करण्यापेक्षा आजच्या तरुण पिढीने आपली आवड व आपल्या गावात अथवा शहराला गरज असलेल्या कोणत्याही एका ट्रेडचे कौशल्य मिळवून आपला स्वतःचा स्वयंरोजगार निर्माण करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, विद्यार्थ्यांनी शालेय तसेच महाविद्यालयीन काळातच आपल्याला कोणत्या विषयाचे कौशल्य प्राप्त करायचे आहे. त्याचे ज्ञान घेणे गरजेचे असून, त्यावर आधारित आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःसह आपल्या गावाचा विकास साधावा. अत्यंत मन लावून व परिश्रम घेऊन अभ्यास करावा. स्वतःचे आत्मनिरीक्षण करून आपल्या स्वतःमधील उणीव शोधाव्यात व त्यावर परिश्रम घेऊन सुधारणा करावी व कौशल्य आत्मसात करावे, असेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com