Sugarcane Crushing
Sugarcane Crushing Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : सोलापूर जिल्ह्याने ओलांडला दीड कोटी टन गाळपाचा टप्पा

Team Agrowon

Solapur News : चालू गळीत हंगामात सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी (Sugarcane factory) दीड कोटी टन ऊस गाळपाचा टप्पा ओलांडला आहे.

जिल्ह्यात १० फेब्रुवारीअखेर एक कोटी ५६ लाख २८ हजार ८८ मेट्रिक टन उसाचे गाळप (Sugarcane Crushing) झाले असून सरासरी ८.८७ टक्के साखर उताऱ्याने एक कोटी ३८ लाख ६५ हजार ४१६ क्विंटल साखर उत्पादन (Sugar Production) केले आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील लोकमंगल (भंडारकवठे) व संत कूर्मदास या दोन कारखान्यांचा हंगाम संपला आहे.

जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यात ६६ लाख ६२ हजार ८५ टन उसाचे गाळप झाले असून ६० लाख ७० हजार ९१६ क्विंटल साखर ९.११ टक्के साखर उताऱ्याने तयार झाली आहे. खाजगी साखर कारखाने ऊस गाळप व साखर उत्पादनात आघाडीवर आहेत.

या कारखान्यांनी ८९ लाख ६६ हजार टन उसाचे गाळप करून ७७ लाख ९४ हजार ५०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. खाजगी कारखान्यांचा सरासरी साखर उतारा मात्र कमी म्हणजे ८.६९ टक्के आहे.

जिल्ह्यात ऊस गाळप व साखर उत्पादनात विठ्ठलराव शिंदे कारखाना आघाडीवर आहे. या कारखान्याने १४ लाख २१ हजार २३५ टन उसाचे गाळप करून १२ लाख ७१ हजार ९०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

जिल्हा एकच, पण साखर उताऱ्यात फरक...

जिल्ह्यातील काही कारखान्यांचा सरासरी साखर उतारा अत्यंत कमी असल्याचे दिसून येत आहे. एकाच जिल्ह्यात घेतल्या जाणाऱ्या उसाच्या उत्पादनातून विविध कारखान्यांच्या साखर उताऱ्यात किमान दोन टक्क्यांची तफावत दिसत आहे.

अर्थात, काही कारखाने थेट उसाच्या रसापासून अथवा बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉलनिर्मिती करत आहेत. त्यामुळे त्यांचा साखर उतारा कमी दिसत आहे. त्यांचा अंतिम साखर उतारा निश्चित झाल्यावर त्यामध्ये किमान दीड टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

मात्र, सर्वच कारखाने इथेनॉलनिर्मिती करत नाहीत. अशा साखर कारखान्यांचा साखर उतारा तुलनेने फारच कमी दिसत आहे.

अंतिम साखर उताऱ्यावरच एफआरपी निश्चित होत असल्याने साखर उतारा तपासण्यासाठी राज्य शासनाने यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. तरच कारखान्यांकडून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Production : हळद उत्पादन वाढीची सूत्रे

Mango Growing : आंबे पिकविण्याची स्वस्त, सुरक्षित पद्धत

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT