Anandacha Shidha Agrowon
ॲग्रो विशेष

Anandacha Shidha : शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गरिबांना ‘आनंदाचा शिधा’

Team Agrowon

Jalgaon News : श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार लाभार्थ्यांना आनंदाच्या शिधा वाटप सुरु झाले आहे.

जळगाव जिल्ह्यासाठी ६ लाख १२ हजार ७६० संच आले आहेत. जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यातील सर्वच रेशन दुकानावर शंभर रुपयात आनंदाचा शिधा वाटप सुरू केले आहे. शिधा मिळू लागल्याने यंदा गोरगरीब लाभार्थ्यांत समाधान आहे.

मैदा, पोहाही संचात

सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त एक किलो साखर, एक लिटर तेल, प्रत्येकी अर्धा किलो परिमाणात रवा, चनाडाळ, मैदा व पोहा असे सहा वस्तूंचा समाविष्ट असलेला ‘आनंदाचा शिधा’ हा संच १०० रुपये दरात ई-पॉस प्रणालीद्वारे वितरित करण्यात येत आहे.

प्रति शिधापत्रिका एक असे या संचाचे वाटप केले जात आहे. शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा संच घेऊन जावे असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.

तालुका आलेले संच

पारोळा ३० हजार १०५

पाचोरा ४५ हजार

चोपडा ४४ हजार ४४३

बोदवड १५ हजार १९५

धरणगाव २९ हजार ७१०

अमळनेर ४६ हजार ३०७

भडगाव २६ हजार ८८५

चाळीसगाव ६१ हजार ८३

जळगाव ८३ हजार ९८८

जामनेर ४७ हजार ५८२

मुक्ताईनगर १७ हजार ६६५

कुऱ्हा ९ हजार ४३५

यावल ३७ हजार २६५

एरंडोल २५ हजार ३६३

भुसावळ ३८ हजार ५००

रावेर ३५ हजार ४५२

सावदा १८ हजार ७८२

एकूण ६ लाख १२ हजार ७६०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT