Farmer's Humanity : द्राक्षबाग कामगारांची दिवाळी शिधापत्रिका नसतानाही गोड

Vineyard Labor : दीपावली मांगल्याचा आणि प्रकाशपर्वाचा सण. मात्र, शेकडो किलोमीटरवरून आलेले द्राक्ष कामगार त्यांचे सुख.दुःख विसरून रात्रंदिवस बागेत काम करीत असतात.
Grape Farming
Grape FarmingAgrowon
Published on
Updated on

Nashik News : मालक अन् कामगार यांचा संबंध केवळ कामापुरता असतो. मात्र काही माणसं याही पलीकडे जाऊन माणुसकी जपतात. आपले गाव सोडून सहा महिने द्राक्षाबागेत राहणाऱ्या २० कामगार कुटुंबीयांकडे शिधापत्रिका नाही.

त्यामुळे त्यांना ‘आनंदाचा शिधा’ मिळत नाही. मात्र तरीही त्यांची दिवाळी गोड झाली आहे. कारण, दिवाळी रुई (ता. निफाड) येथील शेत मालक ज्ञानेश्वर तासकर यांनी कपडे, फराळ देत २० मजुरांच्या चेहऱ्यावर आनंद आणला आहे.

Grape Farming
Grape Advisory : द्राक्ष घड जिरण्याच्या विकृतीवरील उपाय

तासकर म्हणाले,‘‘दीपावली मांगल्याचा आणि प्रकाशपर्वाचा सण. मात्र, शेकडो किलोमीटरवरून आलेले द्राक्ष कामगार त्यांचे सुख.दुःख विसरून रात्रंदिवस बागेत काम करीत असतात.

Grape Farming
Grape Farming : द्राक्ष उत्पादकांशी जोडला गेलो

त्यांचे श्रम, मेहनत आणि निसर्गाची कृपादृष्टी या गोष्टींचा गुणाकार होतो, तेव्हाच द्राक्ष उत्पादक गोड, रसाळ दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन घेतो.’’

आपण स्वतःच्या ताकदीवर द्राक्षशेती करूच शकत नाही. म्हणूनच आपणही आपल्या कामगारांप्रती कुठेतरी संवेदनशील राहून त्यांच्या सुखदुःखात नेहमीच आपापल्या परीने भाग घेण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
- ज्ञानेश्वर तासकर, द्राक्ष उत्पादक, रुई, ता. निफाड, जि. नाशिक.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com