Okra Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Okra Cultivation: जळगाव जिल्ह्यात भेंडी पिकाचे क्षेत्र घटले

Low Rain Impact: जिल्ह्यातील भेंडीचे आगार अशी ओळख असलेल्या एरंडोल, धरणगाव भागांत भेंडीचे क्षेत्र कमी झाले आहे. कमी पाऊस व उष्णतेमुळे अनेकांनी लागवड टाळली आहे.

Team Agrowon

Jalgaon News: जिल्ह्यातील भेंडीचे आगार अशी ओळख असलेल्या एरंडोल, धरणगाव भागांत भेंडीचे क्षेत्र कमी झाले आहे. कमी पाऊस व उष्णतेमुळे अनेकांनी लागवड टाळली आहे. एरंडोलमधील खर्ची, खेडी, कढोली, धारागीर, एरंडोल, कासोदा, जवखेडा, उत्राण, तळई आदी भागांत भेंडी पीक असते.

तसेच धरणगावमधील पथराड, चोरगाव, चांदसर, दोनगाव, पाळधी,  रेल, लाडली, भोकणी, फुलपाट, आव्हाणी व इतर भागात भेंडी पीक बारमाही घेतले जाते. पावसाळ्यात या भागात भेंडी असते. तसेच अनेक जण जूनमध्ये लागवड करतात. परंतु उन्हाळ लागवड बरी होती. पण खरिपातील लागवड घटली आहे.

कमी पाऊस असल्याने जुलैमधील भेंडीची लागवड कमी झाली आहे. ज्या भागात लागवड झाली आहे, त्यातून पुढील महिन्यात किंवा २३ ते ३० दिवसांनंतर काढणी सुरू होईल.गिरणा पट्ट्यात अनेक शेतकरी पावसाच्या अपेक्षेने भेंडी लागवड करतात. भेंडीस चांगला पाऊस असल्यास अनुकूल स्थिती असते. पण यंदा पाऊसमान कमी आहे.

जुलैच्या अखेरीस ऊन तापू लागले. यामुळे अनेकांनी लागवड टाळली. या महिन्यातही ऊनच आहे. यामुळेदेखील शेतकरी भेंडी लागवड टाळत आहेत. सध्या फक्त जलसाठे पुरेसे असलेले शेतकरी भेंडी लागवड करीत आहेत. ही लागवड सध्या जळगाव, यावल, जामनेर भागात सुरू आहे. 

जळगाव जिल्ह्यात खरिपातील किंवा पावसाळी भेंडीचे क्षेत्र सुमारे ८०० ते ९०० हेक्टर आहे. त्यात सुमारे ३०० ते ३५० हेक्टरने घट झाल्याचा अंदाज आहे. पुढे पाऊस आल्यास अनेक जण लागवड करतील. ज्यांनी जूनमध्ये लागवड केली होती. त्यांना जुलैसह या महिन्यातही पिकात सिंचन करावे लागत आहे. अनेक जणांनी पाट पद्धतीने सिंचन सुरू केले आहे. चांगला पाऊस राहिल्यास पावसाळी भेंडीचे जोमदार उत्पादन येते. पण कमी पावसामुळे भेंडी कमी येत आहे. उत्पादनावर त्याचा परिणाम झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

रब्बीत लागवड अधिक

रब्बीच्या सुरुवातीलाच भेंडी लागवड केली जाते. ही लागवड खरिपाच्या तुलनेत अधिक होती. त्यातून काढणी किंवा कमाल तोडे झाल्यानंतर मार्चमध्ये अनेक शेतकऱ्यांनी भेंडीचे क्षेत्र रिकामे केले पण पुन्हा भेंडी लागवड केली नाही. यामुळे हे क्षेत्र घटले आहे. पुढे ऑगस्टअखेरीस लागवड होईल, असा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration: भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी धोकादायक; घरच्या घरी तपासा दुधातील भेसळ

River Linking Project: दुष्काळमुक्तीकडे वाटचाल, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला ७८ टीएमसी पाणी मिळणार- मुख्यमंत्री फडणवीस

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार, कापूस स्थिर, टोमॅचो आवक सुधारली, डाळिंबाला उठाव, मिरचीला उठाव टिकून

Land Acquisition: ‘शक्तिपीठ’साठी पारदर्शक भूसंपादन हवे

NA Permission Rule: शेतजमिनीवर घर बांधण्यासाठी ‘NA’ परवानगीची अट रद्द ; राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT