Okra Cultivation : निर्यातीसाठी अशी करा भेंडीची लागवड

Team Agrowon

कोवळया, गर्द हिरव्या लुसलुशीत भेंडीला निर्यातीसाठी चांगली मागणी असते. निर्यातीसाठी ७.५ ते १० सें.मी. लांब, सरळ पाचधारी भेंडीची टोके निमुळती, टवटवीत आणि देठासह असावीत.

Export Quality Bhendi Production | Agrowon

निर्यातक्षम भेंडीवर लव असू नयेत. फळाचा पृष्ठभाग गुळगुळीत सरळ आणि निरोगी असावा. महत्वाच म्हणजे कीडनाशकांचे रासायनिक अवशेष त्यामध्ये शिल्लक नसावेत.

Export Quality Bhendi Production | Agrowon

हे सर्व निकष पूर्ण करण्यासाठी भेंडीच्या लागवडीपासून सर्व अवस्थेत पिकाचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करणं गरजेचे असते. उन्हाळी हंगामात निर्यातक्षम भेंडीचे उत्पादन सहज घेता येते.

Export Quality Bhendi Production | Agrowon

उष्ण व दमट हवामान चांगल मानवतं. १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो. तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्यास फुलांची गळ होते.

Export Quality Bhendi Production | Agrowon

भेंडीच्या सुधारित वाणापैकी अर्का अनामिका, फुले विमुक्ता, परभणी क्रांती, अर्का अभय या वाणांची निवड करावी. तर संकरित वाणामध्ये भेंडीचे महाबीज ९१३ आणि फुले कीर्ती हे वाण उपलब्ध आहेत.

Export Quality Bhendi Production | Agrowon

वाणाची निवड केल्यानंतर बियाण्याची टोकण किंवा पेरणी करण्यापूर्वी २४ तास साध्या पाण्यात भिजत ठेवावेत. रोपे लवकर उगवून येतात. जोमदार वाढ होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते.

Export Quality Bhendi Production | Agrowon

लागवडीसाठी एकरी १० ते १२ किलो बियाणे लागते. भेंडीची लागवड १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान करावी. लागवड सरी वरंबा, पट्टा पद्धतीने किंवा सपाट वाफ्यावर करावी.

Export Quality Bhendi Production | Agrowon

जमिनीच्या मगदुराप्रमाणे व हंगामानुसार ५ ते ६ दिवसांच्या अंतराने भेंडीला पाणी द्यावे. उन्हाळ्यात ओलावा टिकून राहण्यासाठी वाळलेल्या गवताचे किंवा भाताच्या पेंढ्याचे आच्छादन दोन ओळींमध्ये घालावे.

Export Quality Bhendi Production | Agrowon

भेडीसाठी सेंद्रिय खतांचा वापर तर करावाच याशिवाय. रासायनिक खतांचा वापर करताना लागवडीपूर्वी रासायनिक खतांचे प्रमाण कमी-जास्त झाल्यास रोगांचा प्रादुर्भाव जास्त होऊन झाडांच्या वाढीवर व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. सुरुवातीच्या काळात नत्रयुक्त खताचा वापर कमी करावा.

Export Quality Bhendi Production | Agrowon

Cotton Production : उच्च प्रतीच्या कापूस उत्पादन वाढीसाठी मिशन फाॅर काॅटन प्रोडक्टीव्हीटी योजना

आणखी पाहा...