Hasan Mushrif Agrowon
ॲग्रो विशेष

Washim Development : सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार – हसन मुश्रीफ

Hasan Mushrif : निती आयोगाने वाशीम आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित केला आहे. ही ओळख पुसण्यासाठी आपण प्रयत्न करू. जिल्ह्याच्या प्रगतीचा प्रवास आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य होईल.

Team Agrowon

Washim News : निती आयोगाने वाशीम आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित केला आहे. ही ओळख पुसण्यासाठी आपण प्रयत्न करू. जिल्ह्याच्या प्रगतीचा प्रवास आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य होईल.

सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास जिल्हा महाराष्ट्रातील एक आदर्श जिल्हा बनू शकतो. सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करूया, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस इतर अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. मुश्रीफ म्हणाले, की सन २४-२५ या हंगामासाठी १ लाख ३८ हजार १५ शेतकऱ्यांना १ हजार ६०० कोटी रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या उद्दिष्टाच्या अनुषंगाने, दोन्ही हंगामांमध्ये एकूण १ लाख २४ हजार ६६० शेतकऱ्यांना १ हजार २२७ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप करण्यात आले आहे.

रब्बी हंगामामध्ये कमी खर्चात अधिकचे उत्पन्न मिळून देणारे चियासीड पीक ३५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाले आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेत ३ लाख ८ हजार ४०६ शेतकऱ्यांना रुपये १८४ कोटी पेक्षा जास्त विमा नुकसान भरपाई रक्कम वाटप करण्यात आली आहे.

पीकविमा योजनेत जिल्ह्यातील १ लाख ९६ हजार ५०४ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. जिल्ह्यात २०२४-२५ वर्षात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ७८५ हेक्टर क्षेत्रावर ८१२ लाभार्थ्यांना फळबाग लागवडीचा लाभ देण्यात आला. भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत ५०० हेक्टर क्षेत्रावर २१० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.

अग्रिस्टॅक योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांचे ओळख क्रमांक, फार्मर आयडी तयार होणार आहेत. नुकताच ऑपरेशन द्रोणागिरी या प्रकल्पांतर्गत देशातील पाच जिल्ह्यांपैकी वाशीम जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. ऑपरेशन द्रोणागिरीमुळे वेळ आणि खर्च वाचेल माती आणि पाण्याचे संरक्षण होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT