Shetphale Farmer Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Highway Land Aquisition: शेटफळेत शेतकऱ्यांत फूट पाडून मोजणीचा डाव साधला

Farmer Protest: शक्तिपीठ महामार्गासाठी शेटफळे गावात मोठ्या पोलिस बंदोबस्तात मोजणी सुरू झाली असून संघटित शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाने फूट पाडून डाव साधल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाच्या दबावात काही शेतकऱ्यांनी मोजणीला संमती दिल्याने आंदोलनातील एकजूट ढासळली आहे.

Team Agrowon

Sangli News : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी हजर नसलेल्या आणि सहमती दिलेल्या काही शेतकऱ्यांच्या शेतीची बुधवारपासून मोजणी सुरू केली. तसेच अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून संघटित शेतकऱ्यांमध्ये फूट पाडून मोजणीचा डाव साधून घेतला. गुरुवारी (ता.२६) दुपारनंतर मोजणीच्या कामाला गती आली होती.

शक्तिपीठ महामार्ग आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावातून साडेचार किलोमीटर जाणार आहे. त्यामध्ये ४३० पेक्षा अधिक शेतकरी बाधित होणार असून पन्नास हेक्टर क्षेत्र महामार्गात जाणार आहे. काही जुने आणि नवीन घरे, नवीन बंगले, डाळिंब आणि द्राक्ष बागा, विहिरी, शेततळे, पाइपलाइनचा समावेश आहे. यापूर्वी दोन महिन्यांपूर्वी मोजणीसाठी आलेल्या पथकाला शेतकऱ्यांनी विरोध करून माघारी पाठवले होते. तसेच प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्यासोबत तीन ते चार बैठका झाल्या तरीही शेतकऱ्यांचा विरोध कायम होता.

बुधवारी (ता. २५) दुसऱ्यांदा मोजणीसाठी भूमी अभिलेखचे पथक पोलिस बंदोबस्तात आले होते. त्यांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केल्यावर प्रांताधिकारी बांदल आणि तहसीलदार सागर ढवळे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्याची चर्चा करून समजूत काढण्याचा प्रयत्न केला तरीही शेतकऱ्यांचा विरोध कायम राहिला. पाटील मळ्यात मोजणीसाठी पथक गेले होते. तेथे एका शेतकऱ्याने मोजणीला सहमती दिली.

त्यावेळी जमिनीचे मालक, तसेच अनेक शेतकरी उपस्थित नव्हते. अनेकांना नोटिसा मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे तेही गैरहजर होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी इतर शेतकऱ्यांचा विरोध न जुमानता मोजणी केली. दोन्ही बाजूला खुणा केल्या. गैरहजर असलेल्यांपासून मोजणीस सुरुवात केली. दरम्यान, गुरुवारी दुसऱ्या दिवशी तीन गाड्या भरून पोलिस मोजणीच्या बंदोबस्तासाठी आले होते. सोबत महिला पोलिस आणि पिंजरा गाडी आणली होती.

यावेळी प्रांताधिकारी आणि तहसीलदार सोबत नव्हते. बुधवारी प्रांताधिकारी बांदल यांनी महामार्गाला विरोध करू नका. विरोध केला तरी महामार्ग होणारच आहे. विरोधाचा काहीही परिणाम होणार नाही. वेळप्रसंगी आडवे येणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्याचाही शेतकऱ्यांवर परिणाम झाला.

संघटित शेतकऱ्यांत फूट पाडली. दोन-चार शेतकऱ्यांनी स्वतःहून मोजणीला सहमती दाखवली. परिणामी शेतकऱ्यांत फूट वाढतच गेली, तसा विरोध मावळत गेला. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कायदा आणि कारवाईची भीती दाखवल्याने विरोध मावळला. त्यामुळे पाटील मळा, मोरे मळा आणि तुकाराम बुवाचा मळा या तीनही ठिकाणी दुपारपासून मोजणीला गती आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Price Crash: केळी दर हजाराच्या आत

Cashew Price: काजू बी दर प्रति किलो १६५ ते १७० रुपये

Fertilizer Sampling: खत नमुने काढणी कामाचे फेरवाटप ‘जेडीए’कडे

Maharashtra Rain Update: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस, गारपिटीचा इशारा

Agri Irrigation Subsidy: ठिबकचे २३५ कोटी मार्चअखेर मिळणार

SCROLL FOR NEXT