

रावेर, ता. १० ः नियोजित तळोदा बऱ्हाणपूर या नियोजित चौपदरी राष्ट्रीय महामार्गासाठी शेतीतील एक इंचही जमीन देणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. येथील बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित आज सोमवारी (ता.९) हा निर्धार व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, याबाबतचे निवेदन जवळपास ३०० शेतकऱ्यांनी आजच निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांना दिले.गेल्या तीन जूनला फैजपूर येथे आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत केंद्रीय युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या बोलण्यावरून हा नियोजित महामार्ग शेतकऱ्यांच्या शेतीतूनच जाईल, असे स्पष्ट झाले आहे, असा आरोप हरीश गनवाणी यांनी केला.
या नियोजित महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार असून, ज्यांच्याकडे जेमतेम शेती आहे, त्यांची शेती मोठ्या प्रमाणावर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा नियोजित महामार्ग सध्या सुरू असलेल्या रावेर बऱ्हाणपूर या रस्त्याचे रुंदीकरण करून व आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल करून करण्याची मागणी भागवत पाटील यांनी केली.
''जमीन आमचे हक्काची नाही कुणाच्या बापाची'', ''सुपीक जमिनीचे नियोजित संपादन रद्द झालेच पाहिजे'' अशा घोषणा देत सुमारे ३०० शेतकऱ्यांनी निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांना आमच्या शेतजमिनी महामार्गासाठी देणार नाही, अशा आशयाचे निवेदन दिले. यावेळी हरीश गनवाणी, रामदास पाटील, यादवराव पाटील, ॲड. आर. आर. पाटील यांच्यासह सुमारे ३०० शेतकरी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.