Digital Survey Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Inspection Issue : ई-पीकपाहणीत कोल्हापूर जिल्ह्यातही अडथळे; शेतकरी त्रस्त

Team Agrowon

Kolhapur News : ई-पीकपाहणीत अनेक समस्या येत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणी योजनेत सहभाग घेण्यास फारशी उत्सुकता दाखवलेली दिसून येत नाही. ११ लाख ४८ हजार ९७९ शेतकरी खातेदारांपैकी केवळ ३४ हजार ५६६ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. ७४ लाख ४ हजार ९३२ हेक्टर क्षेत्रापैकी २० हजार २१४ हेक्टर क्षेत्र नोंदवले गेले आहे. पाच टक्के शेतकऱ्यांचीच नोंदणी या ॲपवर झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी भाग डोंगराळ भागात असल्याने रेंजच्या समस्या सातत्याने येत असल्याचे चित्र आहे. अनेक तालुक्यांमध्ये एकूण क्षेत्राच्या तीन ते चार टक्के, तर दुर्गम भागात एक ते दोन टक्केच नोंदणी झालेली दिसते

शिरोळ हातकणंगले करवीर राधानगरी व पन्हाळ्याचा काही भाग वगळता गगनबावडा शाहुवाडी चंदगड आदी भागामध्ये पुरेशी इंटरनेट यंत्रणा नसल्याने ॲपमध्ये तपशील भरतानाही शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वरचा स्पीड अत्यंत कमी असल्याने शेतकरी या सर्व्हर कडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र बहुतांशी भागात आहेत. एकतर सर्व्हरचा स्पीड कमी तो कमी त्यात बरीच भर म्हणून इंटरनेटचा ही स्पीड कमी यामुळे शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणीचा नाद सोडल्याचेच दिसून येते.

तलाठी स्तरावरून ही प्रत्यक्ष भेटी, सोशल मीडिया, व्हॉट्सॲप स्टेटस याद्वारे शेतकऱ्यांना ई-पीकपाहणीचे आवाहन करण्यात येत असले तरी तांत्रिक अडचणी असल्याने शासकीय यंत्रणाही शेतकऱ्यांना प्रभावित करण्यास हतबल ठरत आहे. जोपर्यंत सर्व्हर पूर्ण क्षमतेने काम करणार नाही तोपर्यंत ही गती अशीच मंदावलेली राहील असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्यात यंदा २३ हजार हेक्टर क्षेत्र विम्याच्या संरक्षणाखाली आले आहे. ८६ हजार ६३८ शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेतला आहे. भात व सोयाबीनसाठी २३ हजार ३८३ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. खरीप पीकविमासाठी कोल्हापूर जिल्ह्यात उदासीनता असते. काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या सहभागात वाढ असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

आमच्याकडे रेंज आणि सर्व्हर या दोन्हीचा प्रॉब्लेम आहे. एक दोन वेळा ज्या ठिकाणी रेंज आहे त्या ठिकाणी जाऊन ॲपमध्ये माहिती भरण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व्हर सुरू नसल्याने आम्ही तो प्रयत्न सोडून दिला आहे.
मारुती पाटील, गगनबावडा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Power : पश्चिम विदर्भातील ६ हजार घरांवर सौर ऊर्जानिर्मिती

Suryaghar Yojana : छत्रपती संभाजीनगर परिमंडलात ३६५३ जणांना सूर्यघर योजनेचा लाभ

Majhi Ladki Bahin Yojana : तुम्ही ताकद द्या, ‘लाडकी बहीण’चा निधी वाढवू

PM Modi In Wardha : मोदींच्या हस्ते अमरावतीतील टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन; कापूस उत्पादकांना होणार फायदा?

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT