Cotton production Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Productivity : कापूस उत्पादकता वाढीसाठी ‘न्यूट्रियंट एक्‍स्पर्ट’ विकसित

Central Cotton Research Institute : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापनातून अपेक्षित उत्पादकता मिळावी याकरिता केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने ‘न्यूट्रियंट एक्‍स्पर्ट’ हे ‘सॉफ्टवेअर’ विकसित केले आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे तज्ज्ञ डॉ. ए मणिकंदन यांनी केले.

Team Agrowon

Nagpur News : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापनातून अपेक्षित उत्पादकता मिळावी याकरिता केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने ‘न्यूट्रियंट एक्‍स्पर्ट’ हे ‘सॉफ्टवेअर’ विकसित केले आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे तज्ज्ञ डॉ. ए मणिकंदन यांनी केले.

अमरावती, नागपूर आणि वर्धा येथे ‘न्यूट्रियंट एक्‍स्पर्ट’ (पोषक अन्नद्रव्ये तज्ज्ञ) या ‘सॉफ्टवेअर’ विषयी माहिती व्हावी या उद्देशाने प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. स्वप्नील शेळके (चिस्तूर, आष्टी, वर्धा) यांच्या शेतावर आयोजित प्रशिक्षणाला १२५ शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

आखतवाडा (तिवसा, अमरावती), बेलोरा (अमरावती), काटोल (नागपूर) येथे देखील हे प्रशिक्षण पार पडले. त्यालाही शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. डॉ. मणिकंदन म्हणाले, की अधिक पीक उत्पादकतेसाठी काही शेतकऱ्यांकडून काही वेळा खतांचा अमर्याद वा अतिरेकी वापर केला जातो. त्यातून उत्पादकता वाढ काही प्रमाणात होत असली तरी खर्चही वाढतो०. त्यामुळे अन्नद्रव्य व्यवस्थापन योग्य होण्यासाठी शेतकऱ्यांनी तांत्रिक बाबींवर भर दिला पाहिजे.

‘न्यूट्रियंट एक्‍स्पर्ट’च्या माध्यमातून अपेक्षित उत्पादकता आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनाविषयी माहिती कळते. हा पर्याय देखील काहीसा खर्चिक ठरतो. परंतु उत्पादकता मात्र वाढण्यास मदत होते. हे महत्त्व लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी कापूस उत्पादकता वाढीसाठी तांत्रिक बाबींवर भर द्यावा.

डॉ. माणिक शृंगारे, ‘सिटी सीडीआरए’ चे आशिष बिसेन, डॉ. समीर वायडालकर, अमित कोहळे यांनीही यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांच्या मार्गदर्शनात हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT