Cotton Crop Damage : खानदेशात पावसाने पूर्वहंगामी कापूस पिकाचे नुकसान

Heavy rain Crop Damage : खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकात वेचणी सुरू झाली आहे. ६ ते ८ सप्टेंबर दरम्यानच्या पावसात बोंडांचे अल्प नुकसान झाले.
Cotton Crop
Cotton CropAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकात वेचणी सुरू झाली आहे. ६ ते ८ सप्टेंबर दरम्यानच्या पावसात बोंडांचे अल्प नुकसान झाले. परंतु या आठवड्यातील पावसाने नुकसान वाढत आहे. बोंडे ओली होऊन त्यात आर्द्रता वाढत आहे. दर्जा घसरत असून, त्याचे दर खरेदीदारांनी जुन्या किंवा मागील हंगामातील कापसाच्या तुलनेत कमी निश्‍चित केले आहेत.

जुन्या किंवा मागील हंगामातील साठविलेल्या कापसाचे दर ७६०० रुपये प्रतिक्विंटल आणि नव्या हंगामातील कापसाचे दर ७००० ते ७०५३ रुपये प्रतिक्विंटल, असे निश्‍चित केले आहेत. नव्या हंगामातील पूर्वहंगामी कापूस पिकात या महिन्यातील पावसाने ओलावा किंवा आर्द्रता येत आहे. तो न वाळविता तसाच साठविल्यास त्याचा रंग पिवळा होतो. त्याचा दर्जा घसरतो, असे खरेदीदारांचे म्हणणे आहे. अर्थात, नव्या कापसाचे दरही पावसामुळे कमी झाले आहेत.

Cotton Crop
Rain Update : नगर जिल्ह्याला पावसाची आस; शेतकरी चिंताग्रस्त

यातच पावसाळी वातावरण तयार झाल्याने पूर्वहंगामी कापूस उत्पादकांनी धसका घेतला आहे. कारण एका झाडावर किमान दोन बोंडे पूर्वहंगामी कापूस पिकात उमलली आहेत. त्यांची वेचणी करून घेणे आवश्यक आहे. परंतु मजूरटंचाई आहे. यामुळे वेचणी करताना विलंब होत आहे. काही शेतकरी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने वेचणी करून कापूस लागलीच वाळवून घेत आहेत.

वेचणी करतानादेखील मध्येच तुरळक पाऊस येतो किंवा ढगांची जमवाजमव होते. यात काम थांबवावे लागते. सतत पाऊस आल्यास किंवा तासभर पाऊस झाल्यास बोंडे ओली होऊन ती काळवंडण्याची भीतीदेखील आहे. यामुळे शेतकरी तुरळक पाऊस थांबल्यानंतर पुन्हा कापूस वेचणीचे काम सुरू करतात.

Cotton Crop
Maharashtra Rain Update : राज्यात सर्वत्र पावसाचे पुनरागमन

मागील हंगामात अतिपावसाने पहिल्या वेचणीचा कापूस ६० ते ७० टक्के खराब झाला. त्याला कोंब अंकुरले होते. त्याचे १०० टक्के नुकसान झाले होते. मागील कटू अनुभवदेखील शेतकऱ्यांना अस्वस्थ करीत आहे.

कापसाचे पीक हातात येतानाच पावसाचा धुमाकूळ होईल की काय, अशी भीती असल्याने काही शेतकरी परगावांमधून मजूर आणून, अधिकची मजुरी देऊन वेचणी उरकून घेत आहेत. परगावांतून मजूर आणताना वाहतूक भाडेही शेतकऱ्यांना खर्च करावे लागते.

प्रतिकिलो मजुरी अद्याप अस्पष्ट

पूर्वहंगामी कापूस पिकात सध्या बोंडे उमलण्यास सुरुवात झाली आहे, परंतु प्रतिकिलो यानुसार वेचणीची मजुरी मजुरांना परवडत नाही. यामुळे प्रतिरोज यानुसारच कापूस पिकात वेचणी सुरू आहे. मजुरांना कापूस वेचणीसंबंधी सध्या सकाळी साडेआठ ते दुपारी सव्वातीन यादरम्यान कामासंबंधी २०० रुपये रोज दिला जात आहे. तर सकाळी नऊ ते दुपारी दोन या दरम्यान कामासंबंधी १५० ते १६० रुपये रोज काही गावांत दिला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com