Cotton Crop
Cotton CropAgrowon

Cotton Cultivation of Indigenous Varieties : मूल्यवर्धनातून कापसाच्या नफ्याचे जुळविले गणित

Cotton Cultivation : प्राचीन काळापासून येथे कापसाची लागवड रुजत गेल्याचा दावा केशव निमकर करतात. स्वतः निमकरही देशी कपाशी वाणांची लागवड करून सेंद्रिय पद्धतीने शेती करतात.

Organic farming is done by cultivating indigenous cotton varieties : यवतमाळपासून तीस किलोमीटरवरील वेणी गावची लोकसंख्या सात हजार आहे. जगात कापसाचा शोध कळंब येथील गृत्समद या ऋषींनीच लावल्याचे सांगितले जाते. त्यांचा आश्रम कळंब भागात वर्धा नदीच्या काठावर होता.

येथेच त्यांनी कापूस लागवडीचा प्रथम प्रयोग केला म्हणून त्या गावाला कापशी (जि. वर्धा) असे नाव Inपडले. प्राचीन काळापासून येथे कापसाची लागवड रुजत गेल्याचा दावा केशव निमकर करतात. स्वतः निमकरही देशी कपाशी वाणांची लागवड करून सेंद्रिय पद्धतीने शेती करतात.

केशव निमकर यांची शेती कमी आहे. त्यामुळे उत्पन्नाचे अतिरिक्‍त स्रोत तयार करण्यावर त्यांचा भर असतो. त्यातून त्यांनी २०१५ पासून कृषी पर्यटन केंद्राची सुरुवात केली. जिल्ह्याच्या ठिकाणापासून ३० किमी अंतर, जवळच चिंतामणी मंदिर यामुळे रोज ३० ते ४० पर्यटक भेट देऊ लागले.

त्यांच्यासाठी मटक्‍यातील चुलीवरचे जेवण, विटी दांडू, सायकल, झुले असे खेळण्याचे साहित्य उपलब्ध केले होते. प्रति पर्यटक १५० रुपये असे शुल्क आकारले जात होते. पर्यटकांच्या निवाऱ्यासाठी तुराट्यांपासून झोपडी तयार केली होती.

या व्यवसायातून प्रति माह २५ ते ३० हजार रुपयांचे उत्पन्न हाती येई. मात्र कोरोनादरम्यान ही उलाढाल थांबली. आजही त्याला हवी तशी गती मिळालेली नाही. आता थोडी तयारी आणि व्यवस्थित जाहिरात करून पुन्हा नव्या जोमाने कृषी पर्यटन करण्याचा मानस निमकर यांनी बोलून दाखवला.

देशी वाणाच्या लागवडीवर भर

दरवर्षी सेंद्रिय पद्धतीने शेतमाल उत्पादनावर केशव निमकर यांचा भर असतो. त्यामुळे सूरज, सुरभी, एलआर-५१६ या देशी वाणाची लागवड ते करतात. मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले हे सरळ वाण असून, त्याचे बियाणे त्यांनी वर्धा येथील मगन संग्रहालयातून मिळविले. यंदा पहिल्यांदाच त्यांनी देशी कपाशी वाण लागवडीचा हा प्रयोग केला आहे.

Cotton Crop
Cotton Cultivation : सघन पद्धतीने कापूस लागवड करावी : अनुप धोत्रे

शेतकरी कंपनीची केली स्थापना

तीन वर्षांपूर्वी कार्यकुशल शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली. त्यात साडेतीनशे भागधारक असून, प्रति शेअर १०० रुपयांचा आहे. प्रक्रियेच्या माध्यमातून शेतमालाला चांगला दर मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

यवतमाळ मध्ये जिल्हा परिषदेचा कृषी विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने शेतकऱ्यांचा शेतीमाल विक्री व्हावा याकरिता काही गाळे मुख्य रस्त्यावर बांधली आहेत. लॉटरी पद्धतीने झालेल्या वितरणात एक गाळा कार्यकुशल शेतकरी उत्पादक कंपनीला मिळाला आहे.

येथून खपली, बन्सी गव्हाची सोजी, ज्वारीची सोजी तयार करून विक्री करतात. गहू सोजी ११० रुपये किलो, ज्वारी ७५ रुपये, पाच डाळींचा भरड १८० रुपये प्रति किलो या प्रमाणे विकला जातो. दररोज सरासरी २५०० रुपयांचे उत्पन्न या विक्रीतून होत असल्याचे केशव यांनी सांगितले.

सोजीकरिता प्रक्रिया

सोजी तयार करण्यासाठी सभासदांकडूनच गहू, ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. त्यासाठी कंपनीकडून २० किलो बियाणे दिले जाते. त्यातून मिळालेल्या उत्पादनातून शेतकऱ्याने ४० किलो गहू परत करायचा असतो. उर्वरित गहू शेतकऱ्याने स्वतःला ठेवायचा असतो.

त्यामुळे शेतकऱ्यांसाठीही हा सौदा फायद्याचा ठरतो. निमकर यांनी स्वतःचे दहा गुंठे शेत कंपनीच्या नावे २९ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिले आहे. येथे ग्रेडिंग, पॅकिंगसाठी शेड बांधले आहे. येथे धान्यापासून सोजी तयार करतात.

साधारणतः एक किलो गव्हापासून ७०० ग्रॅम सोजी व ३०० ग्रॅम पीठ मिळते. सोजीची विक्री केली जाते, तर पीठ घरगुती वापरासाठी ठेवतात. किंवा मागणीनुसरा मिश्र पिठाची विक्री केली जाते.

Cotton Crop
Cotton Cultivation : उसाला पर्याय म्हणून कापसाकडे शेतकऱ्यांचा कल

देशी गाईंचे संवर्धन

केशव यांच्याकडे पाच मोठ्या, सहा लहान गाई आहेत. पाच वासरे आहेत. गावरान गाईचे संकर करत ७५ टक्‍के गवळाऊ तयार केली आहे. एका गाईपासून दोन्ही वेळचे मिळून तीन ते चार लिटर दूध मिळते.

दुधाची विक्री करण्याऐवजी तूप केले जाते. सहा महिन्यांमध्ये अडीच ते तीन किलो तूप मिळते. साधारण तीस लिटर दुधापासून एक किलो तूप तयार होते, असा त्यांचा अंदाज आहे. या तुपाची विक्री अडीच हजार रुपये प्रति किलो या दराने केली जाते.

कंपोस्ट तयार करण्यावर भर

‘आत्मा’अंतर्गत जैविक शेती मिशनच्या माध्यमातून त्यांना दोन कंपोस्ट खड्डे तयार करून मिळाले. सात बाय दोन फूट आणि तीन फूट खोल अशा आकाराच्या खड्ड्यात शेतातील पिकाचे अवशेष उदा. तणकट व अन्य काडीकचरा टाकला जातो. त्यातच गाईचे शेण, गोमूत्र, चुलीतील राख याचा वापर होतो. या माध्यमातून तणकट कुजविले जाते.

नंतर याचा वापर शेतीमध्ये होतो. परिणामी, जमिनीची सुपीकता वाढल्याचे ते सांगतात. केशव यांची अडीच एकर शेती. पॉलिहाउस दहा गुंठे, त्यासोबतच राहते घरही दहा गुंठे क्षेत्रात आहे. पपई लागवडीचा प्रयोग त्यांनी केला आहे. भाजीपाल्यामध्ये पालक, मेथी, लसूण, कांदा असे पीक ते लावतात.

सरकीपासून मिळते अतिरिक्‍त उत्पन्न

तीन किलो कापसापासून २ किलो सरकी मिळते. सरकीला ४० रुपयांपर्यंत दर मिळतो. सरकी अद्यापही विकायची आहे. त्यासोबतच यंदा पहिल्यांदाच मी कापसाचे मूल्यवर्धन केले. पुढील काळात समूहस्तरावर हा प्रयोग करण्याचे नियोजन केशव निमकर करत आहेत.

...अशी आहे प्रक्रिया व दर

तीन किलो कापसापासून एक किलो रुई मिळते.

एक किलो रुईपासून ८ मीटर कापड मिळते.

धाग्याच्या जाडीनुसार कापड मिळण्याचा दर ठरतो.

१ किलो पेळू बनविण्याचा खर्च ः १२६ रुपये.

१ किलो (३५ काउंट धागा) कताई मजुरी खर्च ः ३० रुपये

१ किलोपासून ८ मीटर कापड बनतो ः ८०० रुपये

३५ काउंटचा एक मीटर कापड बनविण्याचा खर्च ः १०० रुपये

३०० रुपये मीटरने कापड विकले गेल्यास २४०० रुपये होतात.

८ मीटर कापड तयार करण्यासाठी होणारा १२०० रुपये खर्च वजा जाता १२०० रुपये निव्वळ नफा उरतो.

८ मीटर कापडाच्या विक्रीसाठी ३० टक्‍के कमिशन अपेक्षित धरता ३६० रुपये होतात.

१२०० मधून ३६० वजा जाता ८४० रुपये प्रति किलो उरतात.

८४० (भागिले) तीन किलो कापूस अपेक्षित धरता २८ रुपये प्रति किलो दर (२८ हजार रुपये प्रति क्‍विंटल) मिळतो.

केशव निमकर ९१६८३२०५६९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com