Farm Pump Bill agrowon
ॲग्रो विशेष

Farm Pump Bill : शेतकऱ्यांना दहा पट वाढीव दराने पाणीपट्टीच्या नोटिसा

Water Resources Department : सहकारमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे वाढीव पाणीपट्टीला लागणार ब्रेक

Team Agrowon

Pune News : मंचर, जि. पुणे : शेतीसाठी कृषिपंपांद्वारे पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांना दहा पट वाढीव दराने पाणीपट्टी भरण्याच्या नोटिसा जलसंपदा विभागाकडून आल्या आहेत. या बाबत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वाढीव दरवाढ रद्द करण्याबाबत पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणीपट्टी प्रश्नाबाबत तत्काळ तपासणी करून कार्यवाही करण्याचे आदेश राज्य जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर यांना दिले आहेत.

याप्रमाणे अंमलबजावणी झाल्यास संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढीव पाणी पट्टीला ब्रेक लागणार आहे. मंचर येथे वळसे पाटील यांना गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ भेटले होते. नागपूर विधी मंडळात मंगळवारी (ता. १९) वळसे पाटील यांनी फडणवीस यांना पत्र देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली होती.
आंबेगाव, जुन्नर, शिरूर व पारनेर तालुक्यांत कुकडी प्रकल्पाअंतर्गत घोड, मीना, कुकडी, कालवे या कार्यक्षेत्रात कृषिपंपांद्वारे लाभधारक शेतकरी पाणी वापर करतात. त्यांना पिकानुसार हेक्टरी सरासरी एक हजार ५०० रुपये वार्षिक पाणीपट्टी आकारली जात होती.पण यावर्षी हेक्टरी बारा हजार रुपये वार्षिक पाणीपट्टी आकारली आहे. पाणीपट्टी रक्कम पाहून शेतकरी वर्गात खळबळ उडाली.


पाणीपट्टीच्या दरांमध्ये झालेली वाढ फारच जास्त असल्याने वाढीव दराने पाणीपट्टी भरणे शेतकऱ्यांना अडचणीचे आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडेल. यामुळे शेतकऱ्यांच्या रोषात वाढ होईल. या बाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असा मला विश्वास आहे.
- दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री


कुकडी प्रकल्पाअंतर्गत ७० बंधारे व तीन नद्या आहेत. तीस हजार शेतकरी पाण्याचा वापर करतात. शेतकऱ्यांनी कृषी पंपांना पाणीमापक यंत्र (मीटर) बसविल्यास त्या प्रमाणात पाणीपट्टी रक्कम आकारणे सोयीचे होईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पाणीमापक यंत्र बसवून सहकार्य करावे.
- प्रशांत कडूसकर, कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग नारायणगाव क्रमांक १


कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१ च्या कार्यक्षेत्रात बारा हजार १२९ क्षेत्रावर उपसा परवाने देण्यात आले आहेत. जवळपास दहा हजार खासगी उपसा परवानाधारक आहेत. खासगी उपसा सिंचन धारकांची संख्या जास्त असल्याने सर्वांनीच पुढील एक ते दोन वर्षांत जलमापक यंत्रे उपलब्ध करणे व बसविणे अडचणीचे आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांना थोडा कालावधी वाढवून द्यावा.
- गोविंद खिलारी, प्रगतशील शेतकरी भराडी, ता. आंबेगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT