Team Agrowon
इचलकरंजी येथे सर्वपक्षीय समिती व विविध संघटना यांचेवतीने वाढीव वीज दरवाढीविरोधात प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी महावितरण कंपनीने यावेळी मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल याचिकेमध्ये आगामी दोन वर्षांमध्ये ६७,६४४ कोटी रुपये तूटीच्या भरपाईची मागणी केलेली आहे.
एकूण दोन वर्षांचा हिशोब करता ही मागणी सरासरी ३७% दरवाढीची आहे.
स्थिर व/वा मागणी आकार, वहन आकार व वीज आकार या तिन्ही आकारांत वाढीची मागणी असून एकूण परिणामी वाढ सरासरी २.५५ रु. प्रति युनिट आहे.
दरवाढीच्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी ड्यूटीचा अतिरिक्त बोजा ग्राहकांवर पडणार आहे.
ही दरवाढ पूर्णपणे रद्द करण्यात यावी व राज्यातील सध्याचेच वीजदर कमी करून देशातील अन्य राज्यांच्या तुलनेने स्पर्धात्मक व समपातळीवर आणावेत या मागणीसाठी हे निवेदन सादर करण्यात आले.