Maharashtra Weather Forecast Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Weather Update : ईशान्य मॉन्सून आणखी काही काळ राहणे शक्य

Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रावर आज (ता.१४) दक्षिण भागावर १००६ व उत्तरेकडील भागावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. दक्षिण महाराष्ट्रावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र राहण्यामुळे पावसाचे प्रमाण उत्तरेकडील भागावर हलक्या, तर दक्षिणेकडील भागावर मध्यम स्वरूपात राहण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Maharashtra Rain 2024: महाराष्ट्रावर आज (ता.१४) दक्षिण भागावर १००६ व उत्तरेकडील भागावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. दक्षिण महाराष्ट्रावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र राहण्यामुळे पावसाचे प्रमाण उत्तरेकडील भागावर हलक्या, तर दक्षिणेकडील भागावर मध्यम स्वरूपात राहण्याची शक्यता आहे.

वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. त्यामुळे ज्या भागात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल तेथे ईशान्य मॉन्सूनचा पाऊस होईल. पश्‍चिम महाराष्ट्रात वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होईल. विशेषतः सांगली, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग ताशी १४ ते १६ किमी राहील.

बुधवारी (ता. १६) अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण कोकणात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता राहील. दक्षिणेकडील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण वाढणे शक्य आहे.

त्यामुळे परतीचा मॉन्सून आणखी काही काळ राहण्याची शक्यता आहे. हवामान ढगाळ राहील. सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणातही घट होईल. हवामान बदलाचे परिणामामुळे परतीचा मॉन्सून महाराष्ट्रातून थोडा उशिराच बाहेर पडेल.

प्रशांत महासागराच्या पेरूजवळ पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान १४ अंश सेल्सिअस, तर हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस राहण्यामुळे परतीचा मॉन्सून लांबण्याचे मुख्य कारण आहे.

कोकण आज (ता. १४) सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ ते १७ मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात १३ ते १४ मिमी, रायगड जिल्ह्यात ११ ते १४ मिमी, ठाणे जिल्ह्यात १० ते १२ मिमी व पालघर जिल्ह्यात ४ ते १२ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किमी राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस, तर रायगड व पालघर जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस आणि ठाणे जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील.

आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ८० ते ८४ टक्के, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत ७१ ते ७३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ५० ते ६० टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र आज (ता.१४) नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत १० ते १६ मिमी, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ६ ते ८ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्य व पूर्वेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ किमी राहील.

कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील.

आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ५० टक्के राहील. मराठवाडा आज (ता.१४) धाराशिव जिल्ह्यात १ ते २ मिमी, परभणी जिल्ह्यात १ ते ५ मिमी, लातूर जिल्ह्यात १ ते ६ मिमी, नांदेड जिल्ह्यात १ ते ८ मिमी, हिंगोली जिल्ह्यात ५ ते ११ मिमी, जालना जिल्ह्यात १ ते १२ मिमी, बीड जिल्ह्यात ३ ते १४ मिमी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७ ते १४ मिमी राहील.

वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग धाराशिव जिल्ह्यात ताशी १४ कि.मी., बीड जिल्ह्यात ताशी १३ कि.मी. व लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ताशी ११ ते १२ कि.मी. राहील.

कमाल तापमान धाराशिव व लातूर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, नांदेड व बीड जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील.

आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ६० टक्के राहील. पश्‍चिम विदर्भ आज (ता.१४) बुलडाणा जिल्ह्यात ६ ते ११ मि.मी., अकोला जिल्ह्यात १० ते १३ मि.मी., वाशीम जिल्ह्यात १२ ते १८ मि.मी. व अमरावती जिल्ह्यात ९ ते १२ मि.मी. राहील.

वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १० कि.मी. राहील. कमाल तापमान बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, अमरावती जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, तर अकोला जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान वाशीम जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस व अकोला जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४२ ते ५१ टक्के राहील. मध्य विदर्भ आज (ता.१४) नागपूर जिल्ह्यात ६ ते ११ मि.मी., वर्धा जिल्ह्यात ८ ते ११ मि.मी. व यवतमाळ जिल्ह्यात ६ ते १५ मि.मी. पावसाची शक्यता आहे.

सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ कि.मी. राहील. कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६६ ते ७७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४७ ते ५२ टक्के राहील. पूर्वविदर्भ आज (ता. १४) गोंदिया जिल्ह्यात १ ते ६ मि.मी., भंडारा जिल्ह्यात ४ ते ७ मि.मी., गडचिरोली जिल्ह्यात ६ ते ८ मि.मी. व चंद्रपूर जिल्ह्यात ८ ते ११ मि.मी. पावसाची शक्यता आहे.

वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ६ कि.मी. राहील. कमाल तापमान गोंदिया जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ७६ टक्के, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ८३ ते ८८ टक्के राहील दुपारची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ४१ ते ४६ टक्के, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ५४ ते ५५ टक्के राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र आज (ता.१४) कोल्हापूर जिल्ह्यात १२ ते २५ मि.मी, सांगली जिल्ह्यात ४ ते १४ मि.मी., सातारा जिल्ह्यात १२ ते १८ मि.मी., सोलापूर जिल्ह्यात ३ ते ४ मि.मी., पुणे जिल्ह्यात १५ ते १६ मि.मी. व अहिल्यानगर जिल्ह्यात ११ ते १४ मि.मी. पावसाची शक्यता आहे.

वाऱ्याची दिशा ईशान्य व पूर्वेकडून राहील. सोलापूर, अहिल्यानगर व सांगली जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १४ ते १६ कि.मी., तर उर्वरित जिल्ह्यांत ताशी ११ ते १३ कि.मी. राहील. कमाल तापमान कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, तर सांगली, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २२ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५१ ते ६१ टक्के राहील.

कृषी सल्ला

पावसाची शक्यता लक्षात घेऊन पावसात उघडीप असताना सोयाबीनची काढणी व मळणीची कामे करून घ्यावीत. जमिनीत पुरेशी ओल असताना रब्बी ज्वारी व हरभरा पिकाची पेरणी करावी. द्राक्ष पिकाची छाटणी १५ ऑक्टोबरच्या दरम्यान करावी.

रब्बी कांदा लागवडीसाठी रोप तयार करण्यासाठी बियांची पेरणी करावी. पावसाची शक्यता असल्याने काढणी केलेला, वाळविलेल्या शेतमालाची सुरक्षित स्थळी साठवणूक करावी.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ,सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT