Akola Apmc Election Agrowon
ॲग्रो विशेष

Akola Apmc Election Update : अकोल्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जांचा पाऊस

अकोला जिल्ह्यात सर्वाधिक १८९ अर्ज अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाले आहेत. त्या पाठोपाठ तेल्हारा १५१, बार्शीटाकळीमध्ये १२१ अर्ज आले.

Team Agrowon

Akola Apmc Election : अकोला जिल्ह्यात सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीची (Agriculture Produce Market Committee Election) रणधुमाळी सुरू झाली असून, या सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्याने चुरस निर्माण झाली आहे.

अकोला, अकोट या बाजार समित्यांमध्ये सर्वाधिक ओढाताण होण्याची शक्यता आहे. त्यातही अकोटमध्ये ही निवडणूक शिगेला पोहोचली आहे. या ठिकाणी तब्बल पाच पॅनेल रिंगणात उतरले आहेत.

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सोमवारी (ता. ३) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली. या दिवशी अर्ज दाखल करायला एकच गर्दी उसळली होती.

जिल्ह्यात सर्वाधिक १८९ अर्ज अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाले आहेत. त्या पाठोपाठ तेल्हारा १५१, बार्शीटाकळीमध्ये १२१ अर्ज आले.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक सहकारी संस्था मतदार संघ, ग्रामपंचायत, व्यापारी-आडते आणि हमाल-मापारी अशा मतदार संघामध्ये होत आहे. जिल्ह्यात काही बाजार समित्यांत २८ एप्रिल व काही ठिकाणी ३० एप्रिलला मतदान होणार आहे.

तत्पूर्वी आता २० एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आलेली आहे. तर जे रिंगणात राहतील त्यांची २१ एप्रिलला यादी प्रसिद्ध होईल.

बाजार समितीमध्ये सहकारी संस्था व ग्रामपंचायत या दोन मतदार संघात सर्वाधिक चुरस तयार झालेली आहे. यात अकोटमध्ये सहकारी संस्था गटात तब्बल १२४ नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहेत.

बाजार समितीनिहाय उमेदवार

अकोला - ९४

बार्शीटाकळी - १२१

बाळापूर - ७४

पातूर - ६२

मूर्तिजापूर- ८२

अकोट - १८९

तेल्हारा - १५१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Purpravan Gave: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६५ गावे पूरप्रवण

Alu Farming Success: वर्षभर अळूला तयार केली बाजारपेठ

Farmer ID for Loan Waiver : २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी 'फार्मर आयडी' अनिवार्य?

Saline Soil Farming Success: अभ्यासूवृत्तीतून खारपाणपट्ट्यात यशस्वी शेती

Tractor Taxation Debate: ‘लक्झरी कार’चा कर ट्रॅक्टरला कशासाठी?

SCROLL FOR NEXT