APMC Election : निवडणुकीसाठी १७ बाजार समित्यांकडे पैसेच नाहीत

राज्यातील २८१ बाजार समित्यांची निवडणूक लागली असली, तरी १७ बाजार समित्यांकडे पुरेसा निधी नसल्याने निवडणूक लागू शकली नाही.
APMC Election
APMC Election Agrowon
Published on
Updated on

बाळासाहेब पाटील

Mumbai News : राज्यातील २८१ बाजार समित्यांची निवडणूक (APMC Election) लागली असली, तरी १७ बाजार समित्यांकडे पुरेसा निधी नसल्याने निवडणूक लागू शकली नाही. तसेच दोन बाजार समित्या विभाजनामुळे पात्र नसल्याने तेथे निवडणुकाच लागल्या नसल्याची स्थिती आहे.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मतदारसंघातील सिल्लोड आणि सोयगाव या दोन बाजार समित्यांचे विभाजन झाल्यामुळे त्या बाजार समित्या निवडणुकीस पात्र ठरलेल्या नाहीत.

राज्यातील २८१ बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने प्रशासक किंवा प्रशासक मंडळ स्थापन करण्यात आले होते. निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर या बाजार समित्यांची निवडणूक लागली.

मात्र जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद, हिंगोली जिल्ह्यांतील वसमत आणि बीडमधील धारूर या चार बाजार समित्यांच्या निवडणुका न्यायालयाच्या आदेशानंतर झाल्या आहेत.

तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड आणि सोयगाव या बाजार समित्यांचे विभाजन झाल्याने त्या बाजार समित्या निवडणुकीस पात्र नाहीत. त्यामुळे १७५ बाजार समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला होता.

APMC Election
Jalgaon Apmc Election Update : जळगाव बाजार समिती निवडणुका युतीतर्फेच लढणार

मात्र पुणे ग्रामीण, हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद येथील १५ बाजार समित्यांकडे निधीच नसल्याने निवडणूक प्रक्रियाच सुरू केलेली नाही. या बाजार समित्या आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्याने निवडणूक निधीच नाही. परिणामी, येथे पुन्हा प्रशासक कामकाज पाहणार आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि संग्रामपूर या दोन बाजार समित्यांनी अपुरा निधी भरल्याने निवडणूक प्रक्रिया सुरू केलेली नाही. राज्यातील २५८ बाजार समित्यांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली होती.

सध्या या बाजार समित्यांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असली, तरी तांत्रिक कारणांचा आधार घेऊन प्रशासक मंडळ किंवा प्रशासकाच्या कामकाजाला मुदतवाढ घेण्याचा राजकीय डावही खेळला जात असल्याची शक्यता आहे.

APMC Election
Akola Apmc Election Update : अकोला बाजार समित्यांमध्ये घडामोडींना वेग, अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण

प्रशासकांसाठी भाजपचा आटापिटा

अनेक बाजार समित्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे या संस्थांवर काहीही करून कब्जा करायचा भाजपचा आडाखा असल्याचे बोलले जात आहे.

प्रशासक आणि प्रशासक मंडळाबाबत उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश देऊनही भाजपचे नेते प्रशासक मंडळासाठी आग्रही आहेत.

काहीही करून पात्र बाजार समित्यांच्या निवडणुका लागू नयेत आणि तेथे आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लागावी, यासाठी थेट मंत्री आणि भाजप नेत्यांच्या कार्यालयातील यंत्रणा कामाला लागल्याची चर्चा आहे.

निधीअभावी निवडणूक न लागलेल्या समित्या

जिल्हा ः बाजार समिती

पुणे ग्रामीण : मुळशी

छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद

हिंगोली : सिरसम

लातूर : शिरूर

नांदेड : कंधार, बिलोली, किनवट, इस्लापूर, कुंडलवाडी, लोहा, माहूर, उपरी, मुखेड

धाराशीव : लोहारा, मोताळा

अपुऱ्या निधीमुळे निवडणूक न लागलेल्या समित्या

जिल्हा ः बाजार समित्या

बुलडाणा : सिंदखेड राजा, संग्रामपूर

निवडणूक पूर्ण झालेल्या बाजार समित्या

जिल्हा ः बाजार समित्या

जालना : भोकरदन, जाफराबाद

हिंगोली : वसमत

बीड : धारूर

विभाजनामुळे अपात्र बाजार समित्या

सिल्लोड, सोयगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com