Sangli Sugarcane Rate agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Sugarcane Rate : सांगलीच्या कारखानदारांना राजू शेट्टींचा अंतीम प्रस्ताव, तोडगा न निघाल्यास आरपारची लढाई

Sugarcane Rate Sangli : सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत नेते राजू शेट्टी यांनी कारखानदारांसमोर अंतिम प्रस्ताव सादर केला.

sandeep Shirguppe

अभिजीत डाके

Sangli Sugarcane Rate : सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेले बैठकीत स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी कारखानदारांसमोर अंतिम प्रस्ताव सादर केला. कारखानदारांनी आमचा प्रस्ताव मान्य न केल्यास आम्ही आमच्या मार्गाने कुठेही आंदोलन करू, असा इशारा शेट्टी यांनी बैठकीत दिला. कारखानदारांसोबत सुमारे दीड तास चर्चा झाल्यानंतर ही तोडगा निघत नसल्याने स्वाभिमानीचे नेते शेट्टी बैठकीतून बाहेर पडले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील ऊस दरा संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शनिवारी बैठक घेतली.

या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, विश्वास कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, क्रांतीचे शरद लाड, वसंतदादा चे विशाल पाटील, यांच्यासह जिल्ह्यातील साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, संदीप राजोबा, महेश खराडे उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे एफ आर पी अधिक शंभर रुपयाचे मागणी केली होती. मात्र जिल्ह्यातील कारखानदार ३१०० रुपये पहिली उचल देण्यावर ठाम आहेत. मात्र, दुष्काळ पट्ट्यातील कारखानदारांनी आक्षेप घेतला.

त्यामुळे शेट्टी यांनी कारखानदारांची मागणी अमान्य केली दरम्यान या बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानदारांना अंतिम प्रस्ताव दिला या प्रस्तावांमध्ये गतवर्षीचा साखर उतारा साडेबारा टक्के पेक्षा अधिक असल्यास पहिली उचल ३२५० रुपये साडेबारा पेक्षा कमी असल्यास ३२०० आणि ज्या कारखान्यांचा साखर उतारा दहा टक्के आहे. त्या कारखान्यांनी ३ हजार १०० रुपये असा शेवटचा प्रस्ताव ठेवण्यात आला.

जिल्ह्यातील कारखानदारांनी गतवर्षी तुटलेल्या उसापोटी तीन हजार रुपयांपेक्षा जास्त दर दिला आहे, त्यांनी ५० रुपये व ज्या कारखान्यांनी ३००० च्या आत दिला आहे, त्याच्याकडून शंभर रुपये देण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला.

केंद्राने घेतलेला इतर इथेनॉल निर्मिती बंदीचा निर्णय मुळात चुकीचा होता सरकारला उशिरा का होईना शहाणपण सुचले. त्यामुळे इथेनॉल बंदीचा निर्णय मागे घेण्यात आला या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. देशात पुढील वर्षी मोठे संकट आहे उसाचे क्षेत्र कमी नाही उसाची एकरी उत्पादकता घटली आहे.

रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती कारणीभूत असल्याची टीका शेट्टी यांनी केली. पदानात घट होत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी असंतुलित खतांचा वापर केल्याने उत्पादनात घट होत असल्याचे चित्र आहे केंद्राने स्फुरद पालाशयुक्त खतांच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT