Nagpur Krushi Bhawan : नागपुरातील कृषी भवनासाठी ३५ कोटी रुपयांचा आराखडा

Agriculture Department : यंदा पहिल्यांदाच आधुनिक कृषी भवनाचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. तब्बल पाच हजार चौरस फूट जागेवर तीन मजली कृषी भवन साकार होणार आहे.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : उपमुख्यमंत्र्यांचा गृह जिल्हा असलेल्या नागपुरात कृषी विभागाच्या कार्यालयाची पार दुरवस्था झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर यंदा पहिल्यांदाच आधुनिक कृषी भवनाचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. तब्बल पाच हजार चौरस फूट जागेवर तीन मजली कृषी भवन साकार होणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर हा गृह जिल्हा. या जिल्ह्यात अनेक आधुनिक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये बहुमजली क्रीडा संकुल, हरित मेट्रो अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. मात्र त्याचवेळी शेतकऱ्यांचा कनेक्‍ट असलेल्या कृषी विभागाकडे मात्र सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले अशी स्थित आहे.

Agriculture Department
Sugarcane FRP Rate : सतेज पाटील यांच्या कारखान्याकडून ३२०० तर महाडिकांनी दिला ३१०० रुपये दर

कदीमबाग परिसरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या इमारतीची अवस्था देखील बिकट असून याच ठिकाणी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय देखील आहे. नागपूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय हे महाराजाबागनजीक आहे.

या कार्यालयाची इमारत देखील पार मोडकळी आली आहे. नागपूर शहरातील मुख्य कार्यालयाची अवस्था अशी असल्याने जिल्ह्यातील इतर कार्यालयाचा विचारच न केलेला बरा ! आता नागपुरात सुसज्ज असे कृषी भवन असावे असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

Agriculture Department
Ethanol Ban : उसाचा रस आणि बी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीची मुभा; शेतकऱ्यांची मात्र कोंडीच

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी त्याकरीता ३५ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. महाराजा बाग नजीक असलेल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या जागेवर ते साकारले जाणार आहे. तीन मजली असलेल्या या प्रस्तावीत इमारतीत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, तालुका, उपविभागीय आणि मंडळ अशा सर्वच कार्यालयांचा समावेश राहणार आहे.

राज्यात शासनाकडून कृषी भवन साकारण्याचे प्रस्तावीत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नागपुरातील कृषी भवनासाठी ३५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी आहे. या इमारतीत कृषी विभागाची सर्व खाती एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एका कामासाठी आल्यानंतर भटकंती करावी लागणार नाही.
रवींद्र मनोहरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com