Department Of Animal Husbandry  Agrowon
ॲग्रो विशेष

Livestock Registration: ‘कृषी’ दर्जानंतर पशुपालकांच्या नोंदणीला मिळेना प्रतिसाद

Animal Husbandry: पशुसंवर्धन क्षेत्राला कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानंतर राज्यभरात पशुपालकांच्या नोंदणीची मोहीम हाती घेण्यात आली.

Team Agrowon

Nagpur News: पशुसंवर्धन क्षेत्राला कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानंतर राज्यभरात पशुपालकांच्या नोंदणीची मोहीम हाती घेण्यात आली. परंतु याबाबत अपेक्षित प्रसार न झाल्याने पशुपालकांचा नोंदणीला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पशुसंवर्धन सचिवांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केल्याचे समजते.

पशुसंवर्धन क्षेत्राला कृषीचा दर्जा मिळाल्यास नैसर्गिक आपत्ती काळात सर्व्हेक्षण व पंचनामा होत भरपाईची प्रक्रिया सुलभ होणार होती. त्याबरोबरच शेतातील बांधकामासाठी आकारल्या जाणाऱ्या महसुली करात समानता व इतर सोयी सुविधांचा लाभदेखील मिळणार होता. त्यामुळे पशुसंवर्धन क्षेत्राला कृषीचा दर्जा मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा फेडरेशनचे अनिल खामकर, शरद गोंडाबे, शुभम महाले,

मातोश्री पोल्ट्रीचे संचालक रवींद्र मेटकर यांच्यासह राज्यभरातील पशुपालकांच्या माध्यमातून सातत्याने होत होती. त्याची दखल घेत पशुसंवर्धन विभागाकडून सविस्तर अहवाल तयार करून मंत्रालयस्तरावर सादर करण्यात आला. पावसाळी अधिवेशनात पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी पशुसंवर्धनाला कृषीचा दर्जा देण्याची घोषणा केली.

या निर्णयाचे पशुपालकस्तरावर स्वागत झाले. त्यानंतर राज्यभरातील पशुपालकांच्या नोंदणीची प्रक्रिया पशुसंवर्धन विभागाच्या स्तरावर हाती घेण्यात आली. त्याकरिता गूगल फॉर्म राज्यातील विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल करण्यात आला. या गूगल फॉर्मवर पशुपालकांनी त्यांच्या व्यवसायाची माहिती नोंदवावी, असे अपेक्षित होते. परंतु याबाबत माहितीच नसल्याने पशुसंवर्धन विभागाच्या या मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

लाखात असलेल्या पशुपालकांपैकी अवघ्या काही हजारांवर पशुपालकांची नोंदणी शक्‍य झाली. पशुसंवर्धन विभागाकडून वरिष्ठस्तरावर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पशुसंवर्धन विभागाच्या सचिवांनी देखील याबाबत तीव्र नाराजी व्यक्‍त केल्याचे वृत्त आहे. खुद्द आयुक्‍तांनी राज्यातील पशुसंवर्धन सहआयुक्‍त व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्‍तांना पाठविलेल्या पत्रातदेखील याबाबत उल्लेख केला आहे.

त्यामुळे आता संबंधित पशुधन अधिकारी अथवा संस्थेअंतर्गत कर्मचाऱ्यांनी पशुपालन प्रकल्पास प्रत्यक्ष भेट देत पशुपालकाची माहिती नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अर्धवट किंवा चुकीची माहिती भरल्यास त्याची जबाबदारी संबंधितांवर निश्‍चित करण्याचा इशाराही पशुसंवर्धन आयुक्‍तांनी दिला आहे.

अशी नोंदवावी लागेल माहिती

छायाचित्र घ्यावे लागेल

मांसल कुक्‍कुटपक्षी, अंडी उत्पादक

पक्षी, जनावरांची अचूक संख्या

दुधाळ जनावरे, मेंढी-शेळी फार्म, वराह फार्म

पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी पशुसंवर्धन क्षेत्राला कृषीचा दर्जा देण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. पशुपालकांची ही गेल्या अनेक वर्षांची मागणी होती. यामुळे नैसर्गिक आपत्ती काळात सर्व्हेक्षण होत भरपाई मिळेल व इतरही लाभ मिळतील.
अनिल खामकर, अध्यक्ष, महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटना
राज्यात ७५ लाखांवर पशुपालक आहेत, तशी माहिती पशुसंवर्धनमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनात दिली होती. त्यांच्या नोंदणीची मोहीम पशुसंवर्धन विभागाने हाती घेतली आहे. आता पशुसंवर्धनला कृषीचा दर्जा मिळाल्याने या मोहिमेला पशुपालकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.
शरद गोडांबे, पोल्ट्री व्यावसायिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India-UK Trade Deal: भारत-इंग्लंड कराराचा शेतकऱ्यांना फायदा नाही

Agriculture Irrigation Scheme: धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम शासन गुंडाळणार

Turmeric Price: हळदीचे दर दबावात

Pomegranate Crop Loss: डाळिंब बागायतदारांवर कोसळले अस्मानी संकट

Maharashtra Rain: विदर्भात जोरदार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT