Cotton Market: चालू कापूस हंगामात जिल्ह्यातील प्रमुख कापूस बाजारपेठ असलेल्या अकोट येथे कापूस महामंडळाने (सीसीआय) शासकीय आधारभूत किमतीनुसार मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी केली आहे. अकोट येथील तीन खरेदी केंद्रांवर मिळून आतापर्यंत एकूण ५ लाख ७७ हजार ३६१ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. मात्र अद्यापही सुमारे आठ हजारांहून अधिक शेतकरी कापूस विक्रीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले जात आहे. .अकोट ही जिल्ह्यातील मोठी कापूस बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. दरवर्षी परिसरातील तसेच शेजारील जिल्हा, तालुक्यांतील शेतकरी येथे कापूस विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर येतात. यंदाच्या हंगामातही अकोटमधील दोन खरेदी केंद्रे तसेच चोहोट्टा बाजार येथील एक केंद्र अशा एकूण तीन केंद्रांवर कापूस खरेदीची व्यवस्था करण्यात आली होती. या केंद्रांवर आतापर्यंत ३५ हजार ९८८ शेतकऱ्यांनी कापूस विक्री केली आहे..CCI Cotton Procurement: कापूस खरेदी उद्यापासून बंद.सीसीआयमार्फत शासकीय हमीभावानुसार कापूस खरेदी होत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर या केंद्रांवर अवलंबून असतात.त्यामुळे नोंदणी करून अनेक शेतकरी आपल्या क्रमांकाची वाट पाहत आहेत. मात्र उपलब्ध माहितीनुसार अजूनही सुमारे साडेआठ हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदीसाठी प्रलंबितआहे.दरम्यान, कापूस महामंडळाच्या कापूस खरेदीची मुदत रविवारी (ता. १५) संपली आहे..CCI Cotton Procurement: सीसीआयची कापूस खरेदी मुदतवाढ नावापुरती; अकोट बाजार समितीकडून चौकशीची मागणी.त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा क्रमांक लागलेला नाही, त्यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अद्याप अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरात किंवा बाजारात साठवून ठेवलेला आहे. खरेदी केंद्रांवरील मुदत संपल्याने उर्वरित कापूस विक्रीचे काय होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. शेतकऱ्यांनी कापूस खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. कापूस खरेदीची मुदत वाढविल्यास उर्वरित शेतकऱ्यांनाही हमीभावाने कापूस विक्रीची संधी मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे..संभ्रम व अनिश्चिततेचे वातावरणया संदर्भात अद्याप शासन किंवा कापूस महामंडळाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे कापूस विक्रीसाठी प्रतीक्षेत असलेल्या हजारो शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.