Health Awareness: तापमानाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रांसह सर्व आरोग्य संस्थांमध्ये पुरेशा औषधांचा व उपचार साहित्याचा साठा उपलब्ध ठेवावा. तसेच उष्मालाटेपासून बचावासाठी आवश्यक खबरदारीबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले..जिल्हा संसर्गजन्य आजार प्रतिबंध समिती, नियमित लसीकरण कार्यक्रम, प्राणीजन्य आजार प्रतिबंध समिती तसेच हवामान बदल व मानवी आरोग्य कार्यक्रम टास्क फोर्सच्या बैठका जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात पार पडल्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजीकर, डॉ. मेश्राम तसेच महिला व बालविकास अधिकारी राजश्री कोलखेडे उपस्थित होते..Heatwave Alert: विदर्भात उष्ण लाटेचा इशारा.बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सांगितले की, जिल्ह्यात गतवर्षी एप्रिल महिन्यात ४५.२ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदविण्यात आले होते. त्यामुळे उष्माघातापासून बचावासाठी शेतकरी व नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करावी. .Heatwave Alert: पालघरमध्ये उन्हाचे चटके.प्रत्येक आरोग्य संस्थेत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला असून, आवश्यक उपचार साहित्य, औषधे, आयव्ही फ्लुईड आणि ओआरएसचा साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. उष्माघाताच्या उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ३० खाटा, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात २ खाटा, प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात ५ खाटा तसेच उपजिल्हा रुग्णालयात १० खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत..हवामान बदलाबाबत जागृतीहवामान बदल आणि मानवी आरोग्य कार्यक्रमांतर्गत हवाप्रदूषण व उष्मालाट याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच पोपटखेड प्राथमिक आरोग्य केंद्र व बाळापूर ग्रामीण रुग्णालय येथे हरितीकरण योजनेअंतर्गत सौर ऊर्जा संच बसविण्यात आले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.