Agriculture Electricity  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : कृषिपंपांना वीजपुरवठा होईना

Agriculture Pump : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील कृषी पंपांना कमी दाबाने वीजपुरवठा केला जात आहे. परिमाणी विहिरी, बोअरवरील विद्युतपंप चालत नाहीत.

Team Agrowon

Parbhani News : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील कृषी पंपांना कमी दाबाने वीजपुरवठा केला जात आहे. परिमाणी विहिरी, बोअरवरील विद्युतपंप चालत नाहीत. सिंचन स्रोतांमध्ये पाणी उपलब्ध आहे. परंतु विस्कळीत वीज पुरवठ्यामुळे ते उभ्या पिकांना देता येत नाही.

रब्बी पेरणीसाठी जमीन ओलाविण्यासाठी अडचणीत येत आहेत. कृषी पंपांना दिवसाचे १२ तास अखंडित योग्य दाबाने वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

परभणी जिल्ह्यात यंदा आजवर अपेक्षित सरासरीच्या तुलनेत २८३.४ मिलिमीटर व ८८.९ मिलिमीटर पावसाची तुट आली आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परभणी जिल्ह्यातील विहिरीच्या पाणी पातळींमध्ये अल्प प्रमाणात वाढ झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागातील विहिरींच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झालेली आहे. सद्यःस्थितीत या दोन जिल्ह्यातील हळद, केळी, ऊस, फळपीके, भाजीपाला पिकांना पाणी द्यावे लागत आहे.

जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यामुळे रब्बी ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांच्या पेरणीसाठी जमिनी ओलाव्या लागत आहेत. परंतु या दोन जिल्ह्यातील कृषी पंपांना सलग तासभर देखील अखंडित वीज पुरवठा मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून येत आहेत. कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने विहिंरीवरील विद्युत पंप चालत नाहीत.

तीन वीज वाहक तारा (थ्री फेज) समान दाबाने वीज पुरवठा केला जात नाही. त्यामुळे विद्युत पंप नादुरुस्तीचे (जळण्याचे) प्रमाण वाढले आहे. भारनियमनाचा कालावधी ८ तासापेक्षा अधिक केला आहे.

अनेक रोहित्रांवरून क्षमतेपेक्षा जास्त पंपांना वीज जोडण्या दिलेल्या आहेत. त्यामुळे शेवटच्या टोकाकडील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना योग्य दाबाने वीज पुरवठा मिळत नाही. सद्यःस्थितीत सिंचन स्रोतांमध्ये पाणी उपलब्ध असूनही विस्कळीत वीज पुरवठ्यामुळे पाणी देता येत नसल्यामुळे पीके सुकत आहेत.

आमच्या शिवारातील कृषी पंपांना वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रावरील वीज जोडण्याची संख्या वाढली आहे. त्यामुळे अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. विद्युतपंप चालत नाहीत. पिकांना पाणी देता येत नाही. दुसरे रोहित्र उभारावे.
- उत्तमराव ढोकर, पिंपरी (रो.) ता. जिंतूर, जि. परभणी
आमच्या येथे कृषिपंपांना दिवसभरात अर्धा तास देखील अखंडित वीजपुरवठा होत नाही. रात्री-अपरात्री वीज येते. अनेकदा रात्रभर वीज गायब असते.त्यामुळे हळद, केळी आदी पिकांच्या गरजेच्यावेळी पाणी देता येत नसल्याने नुकसान होत आहे.
-पंकज अडिकिणे, डोंगरकडा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Digital Farming Training: भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा

Solapur ZP Fund: जि. प., पं. स., सदस्यांना १७१ कोटींची लॉटरी

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

SCROLL FOR NEXT