Panchaganga River agrowon
ॲग्रो विशेष

Panchaganga River : पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी गांभिर्य कोणालाच नाही? पाहणीवेळी अधिकारीच अनुपस्थित

Panchganga River Pollution : पाहणीसाठी जात असताना महापालिका व उपविभागीय अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित नसल्याने देसाई यांनी अशी पाहणी अमान्य केली.

sandeep Shirguppe

Panchaganga Pollution : पंचगंगा नदी प्रदूषणाच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका व करवीर, इचलकरंजी उपविभागीय अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयोजित केलेली पाहणी रद्द करण्यात आली. आज (ता. १४) सकाळी अकरा वाजता सर्व प्रतिनिधींच्या उपस्थितीत पाहणी केली जाणार आहे.

याबाबत प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र दिले होते. त्यामध्ये नदी प्रदूषण रोखण्यासाठी उच्च न्यायालयाने साडेनऊ वर्षांपूर्वी देखरेख समिती नियुक्त केली होती. पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील ही समिती अस्तित्वात होती.

या कालावधीत समिती, जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाशी अनेकवेळा पत्रव्यवहार केला. नदी प्रदूषणाबाबत फारशी प्रगती झाल्याचे दिसून येत नाही. साडेनऊ वर्षांत देखरेख समितीने कोणत्या कामावर देखरेख केली, प्रदूषण रोखण्याचे कोणते काम पूर्ण झाले, याबाबत अभ्यास होणे गरजेचे आहे.

ते पंचगंगा नदीच्या अस्तित्वासाठीही गरजेचे आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची आजची स्थिती, मिसळणारे नाले, उपाययोजना आदी बाबींची पाहणी करून अहवाल न्यायालयासमोर जाणे आवश्यक आहे. त्यासाठी संयुक्त पाहणी व्हावी, अशी मागणी केली होती.

पाहणीसाठी जात असताना महापालिका व उपविभागीय अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित नसल्याने देसाई यांनी अशी पाहणी अमान्य केली. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे यांनी दोन्ही महापालिका व उपविभागीय अधिकाऱ्यांना उद्याच्या पाहणीस उपस्थित राहण्याचे आदेश दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT