Panchaganga River Pollution : जनावरेही तोंड लावणार नाहीत असे पंचगंगा नदीचे दुर्गंधीयुक्त पाणी, नागरिकांचे हाल

Pollution Panchaganga River : जनावरेही तोंड लावणार नाहीत, असे दुर्गंधीयुक्त पाणी पंचगंगा नदी पात्रात सध्या वाहत असल्याने आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Panchaganga River Pollution
Panchaganga River Pollutionagrowon
Published on
Updated on

Smelly water in Panchganga : पिण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यानंतर धरणातून पंचगंगा नदीपात्रात पाणी सोडले. मात्र, सध्या पंचगंगा नदीपात्रात काळपट आणि दुर्गंधीयुक्त पाणी आल्याने नागरिकांबरोबरच जनावरे आणि शेतीच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जनावरेही तोंड लावणार नाहीत, असे दुर्गंधीयुक्त पाणी पंचगंगा नदी पात्रात सध्या वाहत असल्याने आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्याने शेतातील उभ्या पिकांना जगवायचे कसे अशी विवंचना शेतकऱ्यांना लागली होती.

पाटबंधारे विभागाने सध्या धरणातून पाण्याचा पंचगंगेच्या पात्रात विसर्ग काही प्रमाणात सुरू ठेवला आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई नसली तरी काळपट आणि दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

धरणगुत्ती नदीपात्रातील पाणी हातात घेतल्यानंतर पाण्याचा उग्र वास येत आहे. शिवाय पाण्याचा रंग काळपट झाल्याने धरणातून आणखी थोडा विसर्ग वाढवण्याची गरज आहे.

Panchaganga River Pollution
Panchaganga River : कोल्हापूर प्रदूषण मंडळाला जाग कधी येणार?, पंचगंगा नदीत लाखो मासे मृत

उन्हाळ्याला प्रारंभ झाला आहे. शेती आणि पिण्याच्या पाण्याची सोय होणे गरजेचे आहे. यासाठी पाटबंधारे विभागाने नदी पात्र कोरडे न पडता किमान पिणे आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.

सध्या पंचगंगा पात्रात दूषित 66 आणि दुर्गंधीयुक्त पाजी आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात पाच ठिकाणी जल शुद्धीकरण प्रकल्प उभारले आहेत. याद्वारे प्रत्येक घरात वीस लिटर शुद्ध पाणी पुरवठा केला जातो. नदीचे पाणी हे इतर खर्चासाठी पुरवठा केला जातो. ते आरोग्यास अपायकारक आहे.

- शेखर पाटील, माजी सरपंच, धरणगुत्ती ग्रामपंचायत

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com