Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Update : ‘ताकारी’च्या पाण्याने जाणवू दिला नाही दुष्काळ

Takari Irrigation Scheme : ताकारी योजना कार्यान्वित झाल्यापासून २०-२२ वर्षांत लाभक्षेत्रातील शेतीला शाश्वत पाणी मिळू लागले.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्याच्या घाटमाथ्याला पावसाने पावसाळ्यातच चकवा दिला. दुष्काळाच्या सावटाने जनता भेदरली होती. मात्र ताकारी उपसा योजना वेळोवेळी सुरू राहिल्याने यंदा ताकारी लाभक्षेत्राला दुष्काळाची दाहकता अद्याप जाणवली नाही.

ताकारी योजना कार्यान्वित झाल्यापासून २०-२२ वर्षांत लाभक्षेत्रातील शेतीला शाश्वत पाणी मिळू लागले. परिसराने शेतीप्रगतीतून समृद्धी साधली. पर्जन्यमान कमी झाल्याने ताकारी योजनेला पाणी पुरविणारे कोयना धरणही यंदा पूर्णतः भरले नाही.

घाटमाथ्यावर ऐन पावसाळ्यातच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली. अशा वेळी कृष्णा नदीतून वाहून जाणारे पावसाचे पाणी ताकारी योजना सुरू करून दुष्काळी भागाला देण्याचे ठरले. त्यानुसार २३ जुलैला ताकारी योजना सुरू झाली.

सलग ४० दिवस या पाण्याने मुख्य कालव्याच्या १४४ किमीपर्यंत पाणी पोहचवले. नंतर ६ नोव्हेंबरला रब्बीचे पहिले आवर्तन सुरू झाले. तेही ५० दिवस सुरू राहिले. रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन २२ जानेवारीपासून १७ मार्चपर्यंत ५६ दिवस सुरू होते.

अशा प्रकारे पाटबंधारे विभागाच्या अचूक नियोजनामुळे पाऊस झाला नाही तरी ताकारीच्या पाण्याने लाभक्षेत्राला आत्तापर्यंत दुष्काळ जाणवू दिला नाही.

ताकारी योजनेच्या मुख्य कालव्याची लांबी १४४ किमी आहे. १०२ वितरीका आहेत. १८ हजार हेक्टर सिंचनक्षेत्राला पाणी देताना पाटबंधारे विभागाची दमछाक होत असली तरी शेतीला मुबलक पाणी देण्याचा कटाक्ष आहे. कडक उन्हाळ्यामुळे जमिनीतील पाणीपातळी भरभर खालावते. यानंतरचे आवर्तनही एप्रिल महिन्यात सुरू करणार आहोत.
- राजन डवरी, कार्यकारी अभियंता, ताकारी योजना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT