Agriculture Irrigation : शेतीसाठी जिहे-कठापूरचे आवर्तन सुरू करा

Farmer Demand for Water : जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेचे आवर्तन नेर तलावात लवकरात-लवकर सुरू करावे. तसेच चारा पिकांसाठी हे पाणी येरळा नदी, कालवे व पोटपाटातून सोडण्यात यावे, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकरी करत आहेत.
Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon

Satara News : सध्याचा कडक उन्हाळ्यामुळे पशुधनाच्या व पिण्याच्या पाण्याची झालेली टंचाई तसेच शेतीला असलेली पाण्याची निकड पाहता जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेचे आवर्तन नेर तलावात लवकरात-लवकर सुरू करावे. तसेच चारा पिकांसाठी हे पाणी येरळा नदी, कालवे व पोटपाटातून सोडण्यात यावे, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकरी करत आहेत.

या भागातील पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात खालावली असून जलस्रोत कोरडे ठणठणीत पडू लागले आहेत. शेती सिंचनाची परिस्थिती बिकट झाली आहे. पाण्याअभावी चारा आणि नगदी पिके अडचणीत सापडली आहेत. पशुधनाच्या आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू आहे. सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक देखील चिंतेत आहेत.

Agriculture Irrigation
Devna Irrigation Project : देवना सिंचन प्रकल्पाच्या कामाला कार्यारंभ आदेश प्राप्त

येरळा नदी कोरडीठाक पडल्याने नदीकाठच्या पाणी योजना अडचणीत आल्या आहेत. काही भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. जिहे-कठापूरच्या पाण्याचा आधार भेटल्याने लाभक्षेत्रात आले, ऊस आदी बारमाही पिकांचे क्षेत्र वाढले आहे. फळबागांचे क्षेत्र वाढले आहे.

चाराटंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना मका, कडवळ आदी उन्हाळी चारा पिकांची पेरणी करायची आहे. या परिस्थितीत सिंचनासाठी पाण्याची गरज असताना पाणीटंचाईची समस्या उद्भवल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच खटाव तालुक्याला वरदान ठरलेल्या नेर तलावात फक्त २८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

Agriculture Irrigation
Well Irrigation : वाशिम जिल्ह्यातील तीन तालुक्यात १०० टक्के सिंचन विहिरींना मंजुरी

तलावात पाणीसाठा वाढला तरच लाभक्षेत्रातील नेर, पुसेगाव, खटाव, भुरकवडी, कुरोली सिद्धेश्वरसह येरळवाडीपर्यंतच्या हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. तसेच पाणी योजनांच्या माध्यमातून पशुधनाच्या आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होईल. त्यामुळे जिहे-कठापुरचे आवर्तन सुरू करून नेर तलाव भरावा अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकरी करत आहेत

शेतीसह गावांना फायदा

नेर तलावात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्यास या पाण्याचा लाभ शेतीसह अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांना होतो. सध्या नेर तलावात अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे नेर तलावात जिहे-कठापूरचे आवर्तन सुरू करणे गरजेचे झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com