Orange Fruit Fall Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Crop Insurance : विमा परताव्यात संत्रा फळगळतीचा निकषच नाही

Orange Fruit Fall : विमा परताव्याच्या अटींमध्ये फळगळती हा निकष समाविष्ट नसल्याने आंबिया बहरातील संत्रा उत्पादकांना भरपाई मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News : विमा परताव्याच्या अटींमध्ये फळगळती हा निकष समाविष्ट नसल्याने आंबिया बहरातील संत्रा उत्पादकांना भरपाई मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. अमरावती जिल्ह्यात वरुड, मोर्शी, अचलपूर, चांदूरबाजार, तिवसा या तालुक्यांसह इतर ठिकाणी ७० हजार हेक्टर क्षेत्रावर संत्रा बागा आहेत. वर्षभरात संत्र्याचे आंबिया व मृग, अशा दोन बहरांचे उत्पादन घेतले जाते.

आंबिया बहर सध्या अंतिम टप्प्यात आहे. या बहरातील संत्रा उत्पादक फळगळतीने हवालदिल झाला होता. विशेषतः वरुड, मोर्शी या मुख्य उत्पादक पट्ट्याच्या तुलनेत अचलपूर, चांदूरबाजार व तिवसा या तालुक्यांत फळगळतीचे प्रमाण सर्वाधिक आहे.

संत्रा उत्पादकांना विमा संरक्षण देण्यात आले असले, तरी विमा परताव्याच्या ट्रिगरमध्ये फळगळतीचा निकष नाही. कमी-अधिक पाऊस, गारपीट, अवकाळी पाऊस, अधिक तापमान, पावसाचा खंड आदी ट्रिगर आहेत.

आंबिया बहरात दरवर्षी फळगळती होत आहे. बहुतांश संत्रा उत्पादक पट्ट्यातून या बाबत तक्रारी कृषी विभागाकडे केल्या जातात. जवळपास ३० ते ४० टक्के नुकसान होते. संत्रा उत्पादकास आंबिया बहरात १२ हजार रुपये व मृग बहरात चार हजार रुपये प्रति हेक्टर प्रीमियम भरावा लागतो.

आंबिया बहरातील प्रत्येक ट्रिगरमध्ये हेक्टरी २० हजार रुपये विमा परतावा मिळतो. परंतु फळ गळतीचा ट्रिगर नसल्यामुळे संत्रा उत्पादकांना गेल्या अनेक वर्षांत विमा भरपाई मिळाली नाही, हे मात्र वास्तव आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT