Orange Subsidy : संत्रा निर्यातीसाठी ५० टक्के अनुदान

Orange Export Updates : ‘‘जिल्ह्यासह विदर्भातील शेतकऱ्यांच्या संत्र्याची बांगलादेशमध्ये निर्यात होते. मात्र बांगलादेशने आयात शुल्कावर कर लादल्याने प्रदेशातून जाणाऱ्या संत्र्यांची निर्यात अचानक थांबली.
Orange
OrangeAgrowon

Nagpur News : ‘‘जिल्ह्यासह विदर्भातील शेतकऱ्यांच्या संत्र्याची बांगलादेशमध्ये निर्यात होते. मात्र बांगलादेशने आयात शुल्कावर कर लादल्याने प्रदेशातून जाणाऱ्या संत्र्यांची निर्यात अचानक थांबली. यावर तोडगा काढण्याच्या प्रयत्नात राज्य शासन आहे. त्यासाठी संत्रा निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनातर्फे ५० टक्के अनुदान प्रतिपूर्ती म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’’ अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ॲग्रो व्हिजन फाउंडेशनतर्फे आयोजित ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचा समारोप सोहळा सोमवारी (ता. २७) झाला. दाभा येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे कृषिमंत्री सूर्यप्रताप साही, अरुणाचल प्रदेशचे कृषिमंत्री टागे टाकी, खासदार रामदास तडस, आमदार दादाराव केचे, हरीश पिंपळे, माजी खासदार विकास महात्मे, आमदार टेकचंद सावरकर, ॲग्रो व्हिजनचे संयोजक रवींद्र बोरटकर, सल्लागार डॉ. सी. डी. मायी उपस्थित होते.

Orange
Orange Crop Management : संत्रा पिकात एकात्मिक अन्नद्रव्याचे व्यवस्थापन गरजेचे

फडणवीस म्हणाले, ‘‘वातावरणातील बदलामुळे शेतीसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. रसायनांमुळे, आपल्या जमिनीची क्षमता हळूहळू कमी होत आहे. त्यावर आळा म्हणून राज्य शासनाने नैसर्गिक शेतीला भर देण्यासाठी अभियान हाती घेतले आहे.

Orange
Orange Processing : संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची ७२ कोटींतून होणार उभारणी

यासाठी राज्यातील लाख हेक्‍टर शेती तीन वर्षात नैसर्गिक शेतीमध्ये रूपांतर करण्याचा मानस आहे.’’ टाकी म्हणाले, ‘‘आम्ही हिमालयात राहत असूनही महाराष्ट्रीयन लोकांच्या खूप जवळ आहोत. कारण हिमालयात विकास करण्यासाठी तुमच्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण ठरतात.’’

‘भविष्यात कोळशाला पर्याय बांबू’

‘‘यंदाचे हे पहिले ॲग्रो व्हिजन आहे, जिथे बांबूपासून पांढरा कोळसा तयार करून कोळशाला पर्याय देण्याचा प्रयत्न होत आहे. वर्ध्याच्या एमगिरीने हे तंत्रज्ञान तयार केले आहे. याची क्‍लोरिफिक व्हॅल्यू ....हजारपर्यंत जाते. हा प्रयोग पर्याय म्हणून उपयुक्त ठरल्यास.....लाख कोटी रुपयांचा बांबू आपण विकू शकणार आहोत. त्यातून लाखो शेतकऱ्यांचे जीवन बदलू शकेल,’’ असा विश्‍वास श्री. गडकरी यांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com