Crop Insurance Agrown
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविमा हप्त्या व्यतिरिक्त जादा शुल्क आकारू नये : कुंभार

Vivek Kumbhar : शेतकऱ्यांनी सामूहिक सेवा केंद्र (CSC) धारकाकडून एक रुपय पीकविमा हप्ता व्यतिरिक्त कोणतेही जादा शुल्क आकारू नये, अशा सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी केंद्रचालकांना दिल्या.

Team Agrowon

Sangli News : खरीप हंगाम २०२४ साठी पंतप्रधान पीकविमा योजनेमध्ये सहभाग घेण्यास १५ जूनपासून सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी सामूहिक सेवा केंद्र (CSC) धारकाकडून एक रुपय पीकविमा हप्ता व्यतिरिक्त कोणतेही जादा शुल्क आकारू नये, अशा सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी केंद्रचालकांना दिल्या.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय कृषी विमा कंपनी व कृषी विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांनी सामूहिक सेवा केंद्र (CSC) चालकांसाठी प्रशिक्षण नुकतेच झाले. या वेळी भारतीय कृषी विमा कंपनी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक उपप्रबंधक नितीन स्वर्णकार,

कृषी उपसंचालक डी. एम. पाटील, सीएससी जिल्हा व्यवस्थापक समीर कांबळे, कंपनीचे सांगली जिल्हा व्यवस्थापक प्रीतम कांबळे, सांख्यिकी शाखेचे सचिन कोरटे, एम. एम. घोडके यांच्यासह सी.एस.सी. केंद्रचालक उपस्थित होते.

कुंभार म्हणाले, की खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीकविमा योजना सुरू झाली आहे. या पीक विम्याची अंतिम मुदत १५ जुलै आहे. सीएससी चालकांनी एक रुपया पीकविमा हप्ता व्यतरिक्त कोणतेही जादा शुल्क आकारू नये.

चालू वर्षापासून केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या पीकविमा संदर्भात शंका समाधानासाठी १४४४७ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sustainable Economy: ध्येय सक्षम अन् शाश्‍वत अर्थव्यवस्थेचे

India Inflation: महेंगाई मार डालेगी

Rabi Season Crisis: बारामतीत खरिपासह रब्बी हंगाम धोक्यात

Agriculture PG Admission: कृषी पदव्युत्तरच्या तिसऱ्या फेरीवेळी गोंधळ

Fruit Processing Industry Development: फळप्रक्रिया उद्योगांसाठी लवकरच नवीन योजना : केंद्रीय कृषी सचिव आतिश चंद्रा

SCROLL FOR NEXT