Bihar Caste Census Agrowon
ॲग्रो विशेष

Bihar Caste Survey : नितीश सरकारने जाहीर केली बिहारमधील जातीनिहाय जनगणना

Bihar Caste Census Report : नितीश कुमार-तेजस्वी यादव सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वीच बिहारमधील जात जनगणनेची आकडेवारी जाहीर झाली आहे. याबाबत गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये चर्चा सुरू होती.

Swapnil Shinde

Caste Based Survey Report : केंद्र सरकारच्या अनेक अडथळ्यांना न जुमानता बिहार सरकारने आज महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून जातीवर आधारित सर्वेक्षण जाहीर केले. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर जेडीयू-आरजेडी सरकारने बिहारमधील जातिगणना सर्वेक्षणाचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. बिहारमध्ये जात आधारित जनगणना करण्याचा प्रस्ताव विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आला होता.

बिहार सरकारने प्रसिद्ध केलेल्या जात जनगणनेच्या अहवालानुसार बिहारची एकूण लोकसंख्या १३ कोटी आहे. यापैकी ८१.९% हिंदू, १७.७% मुस्लिम, ०.०५% ख्रिश्चन आहेत. त्याच वेळी शीखांची लोकसंख्या ०.०१%, बौद्धांची ०.०८%, जैनांची ०.००९६% आणि इतर धर्माच्या लोकांची लोकसंख्या ०.१२% आहे.

नवीन लोकसंख्येच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की येथे सर्वात जास्त लोकसंख्या इतर मागासवर्गीय आणि अत्यंत मागासवर्गीयांची आहे. जर आपण दोन्हीचे आकडे एकत्र केले तर संख्या 63 टक्क्यांपर्यंत पोहोचते. त्याच वेळी, ब्राह्मणांची संख्या 4 टक्के, सर्वसाधारण प्रवर्गाची संख्या 15.52 टक्के आणि लोकसंख्या 20 टक्के अनुसूचित जातीची आहे.

सर्वेक्षण अहवाल जाहीर झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्विट करताना लिहिले की, या सर्वेक्षणाने केवळ बिहारमधील जातींची आकडेवारी प्रसिध्द केली नाहीत तर त्यांचा आर्थिक परिस्थितीचीही माहिती सादर करण्यात आली आहे.

तर राष्ट्रीय जनता दलाचे नेते माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव जात-आधारित जनगणना ऐतिहासिक असल्याचे वर्णन करताना म्हणाले की, राज्यातील वंचित, उपेक्षित आणि गरिबांच्या योग्य विकासासाठी आणि प्रगतीसाठी योजना तयार करण्यात हे आकडे महत्त्वपूर्ण योगदान देतील. ते पुढे म्हणाले की 2024 च्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास अशी जातिनिहाय जणगणना संपूर्ण देशात करण्यात येईल.

अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर भाजप नेत्यांनी नितीश सरकारवर हल्लाबोल केला. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह चौहान म्हणाले की, नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव या दोन्ही नेत्यांनी बिहारवर अनेक वर्षे राज्य केले, पण त्यांनी गरिबांसाठी काय केले, तरुणांना किती नोकऱ्या दिल्या याचे कोणतेही रिपोर्ट कार्ड दिले नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत, २ वर्षांची कारावासाची शिक्षा कायम, प्रकरण काय?

Cold Wave: लातुरात वाढला थंडीचा कडाका; तापमान ११ अंशावर

Farmers Crisis: सीनाकाठच्या शेतकऱ्यांकडे कारखानदारांची पाठ

PMFME Scheme: ‘पीएमएफएमई’ योजनेत अन्नप्रक्रिया उद्योगासाठी पुढे या

Gopinath Munde Farmer Accident Scheme: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना पूर्णपणे डिजिटल; महाडीबीटीवरून थेट मदत मिळणार

SCROLL FOR NEXT