Manipur affected farmers
Manipur affected farmersAgrowon

Manipur Package : मणिपूरमधील शेतकऱ्यांसाठी पॅकेजची घोषणा ; केंद्राकडून हिंसाचारग्रस्त भागासाठी ₹38.06 कोटींची मंजूरी

Crop Compensation : मणिपूरमधील जातीय हिंसाचारग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्यावतीने ३८.०६ कोटींची पीक नुकसान भरपाई पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.
Published on

Manipur Affected Farmers : गेल्या पाच महिन्यांपासून हिंसाचाराच्या (Manipur violence ) घटनांमुळे मणिपूर पेटले आहे. त्यामुळे राज्यभरातील लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर पावसाच्या खंडामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हिंसाचारग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. गृह मंत्रालयाच्यावतीने ३८.०६ कोटींची पीक नुकसान भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Manipur affected farmers
Tembhu Irrigation Project : टेंभूच्या विस्तारीत योजनेस मुख्यमंत्र्याची मंजूरी ; सांगलीत सुमन पाटील आणि रोहित पाटलांचं आजपासून उपोषण

मणिपूरमधील हिंसाचारामध्ये इम्फाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, कक्चिंग थौबल आणि बिष्णुपूर या पाच जिल्ह्यातील ५ हजार २८८ हेक्टर शेतजमीन क्षेत्र सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. ते एकूण ९,७१९ हेक्टर क्षेत्रफळाच्या ५४,४ टक्के आहे. त्यामुळे यावर्षी राज्याचे कृषी क्षेत्रात सुमारे २२६.५० कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

त्यामध्ये सर्वाधिक नुकसान तांदूळाच्या उत्पादनात होण्याची शक्यता असून ते सुमारे २११.४१ कोटी रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. ते राज्याच्या एकूण कृषी क्षेत्राच्या ९३.३६ टक्के आहे, त्यानंतर पशुसंवर्धन व्यवसायाचा समावेश होणार आहे.

कृषी विभागाचे आयुक्त आर.के. दिनेश सिंह म्हणाले की, हिंसाचारग्रस्त शेतकर्‍यांना पीक नुकसानभरपाईसाठी गृह मंत्रालयाला प्रस्ताव दिला होता. त्यास केंद्र सरकारकडून मंजूरी देत ३८.०६ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. बाधित शेतकऱ्यांना नोव्हेंबर महिन्याअखेरपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर काम सुरू आहे.

लुमी शिन्मी अपुनबा लूप या शेतकरी संघटनेने केलेल्या स्वतंत्र सर्वेक्षणात दावा केला आहे की, राज्यातील सुमारे ९ हजार ७१९ हेक्टर भातशेतीमधील पिकांचे नुकसान होऊ शकते. संघटनेचे अध्यक्ष मुटुम चुरामणी म्हणाले, “सध्या राज्यात पूर्वीसारखी परिस्थिती नाही. मे महिन्यात हिंसाचार सुरू झाल्यापासून, शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. कारण मधूनमधून गोळीबाराच्या घटना घडत आहेत.

मणिपूर सरकारने पावसाळी खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कृषी कामांसाठी सुरक्षा पुरवण्यास सुरुवात केली. त्यासाठी बाधित जिल्ह्यांमध्ये सुमारे दोन हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी कडक बंदोबस्तामध्ये नांगरणी-पेरणीची कामे केली. परंतू हिंसाचाराच्या घटना वाढल्याने शेतकऱ्यांना घराबाहेर पडणे मुश्लिक झाले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पीक काढणीची काम करता येत नसल्याने हंगामा वाया गेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com