
Bengaluru News : देशातील विरोधकांची बैठक बंगळूरु येथे मंगळवारी (ता. १८) झाली. या बैठकीसाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह देशातील विरोधी पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.
या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, विरोधकांच्या या आघाडीला ‘इंडिया’ असे नाव देण्यात आले आहे. भाजप सरकारने लोकाशाहीविरोधी कृत्ये केली आहेत. विरोधकांना संपवण्यासाठी तपास यंत्रणांना गैरवापर भाजपकडून होत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला.
दरम्यान, ‘इंडिया’ची पुढील बैठक मुंबईत होणार आहे. विरोधकांमध्ये समन्वय साधण्यासाठी ११ जणांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. एनडीएमध्ये ३८ पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भाजपविषयी बोलताना खर्गे म्हणाले की, एवढे पक्ष आणले कुठून? हा प्रश्न आहे. नोंदणीकृत पक्षांचा अंदाज घेतल्यास हे शक्य नसल्याचे खर्गेंनी स्पष्ट केले.
पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडणुकीनंतर ठरणार असल्याची माहिती आहे. विरोधकांच्या बैठकीमध्ये पंतप्रधान पदाच्या उमेदवाराबद्दल चर्चा झाली. मात्र त्यावर निवडणुकीनंतर बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राजकीय मतभेद बाजूला ठेवून आम्ही एकत्र आल्याचे या वेळी खर्गे यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.