Mhaisal Irrigation Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Mhaisal Irrigation Scheme : म्हैसाळ सिंचन योजनेचे नऊ पंप सुरू

Agriculture Irrigation : यंदा अतिपावसामुळे वारणा आणि कृष्णा नदीतून पुराचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला देण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले. त्यामुळे पाटबंधारे विभागाने जुलैच्या शेवटच्या आठवड्यात म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू केली.

Team Agrowon

Sangli News : पुराचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हैसाळ सिंचन योजना सुरू केली आहे. एक महिन्यापासून ही योजना सुरू असून आजअखेर १३७५ दशलक्ष घनफूट इतके पाणी उचलले आहे, अशी माहिती म्हैसाळ सिंचन योजनेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

जिल्ह्यात जूनच्या मध्यापासून मुसळधार पाऊस झाला. वारणा आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली. यामुळे धरणातील पाणीसाठ वाढू लागला. जुलैमध्येही अतिवृष्टी झाली. त्यामुळे वारणा आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला.

हळूहळू विसर्गात वाढही केली होती. त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. तर पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे काही प्रमाण पाण्याची आवश्यकता होती.

यंदा अतिपावसामुळे वारणा आणि कृष्णा नदीतून पुराचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला देण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले. त्यामुळे पाटबंधारे विभागाने जुलैच्या शेवटच्या आठवड्यात म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू केली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील नऊ पंप सुरू पाणी उचलून दुष्काळी भागात दिले आहे.

म्हैसाळ योजना गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. आजअखेर या योजनेतून १३७५ दशलक्ष घनफूट इतके पाणी उचलले आहे. गेल्यावर्षीही ऐन पावसाळ्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यात पाणी टंचाई निर्माण झाली होती.

दरम्यान, अशा परिस्थितीतही सिंचन योजना सुरू करून दुष्काळी भागातील शेतीची तहान भागवली होती. यंदाही म्हैसाळ सिंचन योजनेतून पुराचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला दिल्याने शेतीची तहान भागत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT