Agriculture Irrigation : रब्बीसाठी सिंचन प्रकल्पांतून मिळणार पाणी

Rabi Season : खानदेशात रब्बी हंगाम पुढील महिन्यात सुरू होईल. हंगामात यंदा गिरणासह अन्य सिंचन प्रकल्पांतून सिंचनासाठी पाणी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात रब्बी हंगाम पुढील महिन्यात सुरू होईल. हंगामात यंदा गिरणासह अन्य सिंचन प्रकल्पांतून सिंचनासाठी पाणी मिळेल, अशी अपेक्षा आहे. गिरणा धरणातून मागील हंगामात रब्बीला पाणीच मिळाले नव्हते. कारण दुष्काळी स्थितीमुळे हे धरण मागील वेळेस फक्त ५६ टक्के भरले होते.

यंदा हे धरण ९४ टक्के भरले आहे. यामुळे गिरणा पट्ट्यातील २१ हजार हेक्टरला या धरणातून पाणी मिळेल. तसेच जळगाव जिल्ह्यात हतनूर, वाघूर, धुळ्यात अनेर, पांझरा या प्रकल्पांतूनही रब्बीस पाणी मिळेल. पुढे हरभरा, दादर ज्वारी, मका, भाजीपाला पिके, कांदा, सोयाबीनची पेरणी रब्बी हंगामात सुमारे १०० टक्के होईल, अशी अपेक्षा आहे.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation Sector : सिंचन क्षेत्र सुधारणांची भ्रूणहत्या

तसेच सोयाबीन पेरणीचेही नियोजन अनेकांनी केले असून २००० ते २५०० हेक्टरपर्यंत जळगाव जिल्ह्यात रब्बीतील क्षेत्र पोहोचेल, असा अंदाज आहे. ही पेरणी पुढील महिन्यात सुरू होईल, असेही संकेत आहेत.

सोयाबीनचे दर कमीअधिक झाले आहेत. परंतु रब्बीत मका, गहू, ज्वारी पीक परवडत नाही, असेही शेतकरी मानतात. खरिपातील पीक काढणी, मळणी ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच सुरू होईल. ऑक्टोबरच्या मध्यात रब्बीची पेरणी सुरू होईल, असे संकेत आहेत.

यातच शेतकऱ्यांना खरिपात सोयाबीनचे चांगले उत्पादन हाती येईल, असे दिसत आहे. पुढे शेतकरी सोयाबीनच्या दर्जेदार वाणांची स्वच्छता करून उगवणीच्या चाचण्याही घेतील व घरच्या बियाण्यांची पेरणी करतील, असे नियोजन सुरू आहे. सोयाबीनचे खरिपात एकरी सात ते नऊ क्विंटल उत्पादन अनेकांनी मागील वेळेस साध्य केले.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation Subsidy : बुलडाणा जिल्ह्यात ठिबक, ‘तुषार’चे ७२ कोटी थकले

यंदाही पीक जोमात आहे. अनेक शेतकरी रब्बीतही या पिकाकडे वळतील, असे दिसत आहे. रब्बीमधील सोयाबीनला दोन फवारण्या व एकदा रासायनिक खते देऊनही उत्पादन बऱ्यापैकी येते, असे निरीक्षण, अनुभव अनेकांना आहे. यामुळे यंदाही रब्बीत शेतकरी मका, ज्वारी या पिकांचे क्षेत्र कमी करून सोयाबीनचीदेखील पेरणी करतील. धुळे व नंदुरबारात अनेकांनी प्रयोग, नवीन पीक म्हणून रब्बीतील सोयाबीनला मागील हंगामात किंवा रब्बीत पसंती दिली होती.

कापसावर मक्याचे नियोजन

कापूस पीक घेऊन त्यात मक्याची लागवड करण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. पूर्वहंगामी कापूस पिकाखालील क्षेत्र त्यासाठी शेतकरी ऑक्टोबरच्या अखेरीस रिकामे करण्यास सुरुवात करतील. त्यात पूर्वमशागत करून मका व अन्य भाजीपाला पिके घेतली जातील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com