Water Storage  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : माणिकपुंज-नांदगाव पाइपलाइनमुळे यंदा पाण्याची टंचाई भासणार नाही

Water Shortage : गिरणा धरण ते नांदगाव स्वतंत्र पाणीपुरवठा योजना लवकरच पूर्ण होणार असून, माणिकपुंज-नांदगाव नव्याने झालेल्या पाइपलाइनमुळे या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवणार नाही.

Team Agrowon

Nashik News : गिरणा धरण ते नांदगाव स्वतंत्र पाणीपुरवठा योजना लवकरच पूर्ण होणार असून, माणिकपुंज-नांदगाव नव्याने झालेल्या पाइपलाइनमुळे या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवणार नाही. त्यामुळे यंदा किमान पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ दूर होणार आहे.

येथील येवला रस्त्यावर पालिका जलकुंभ स्थळावर दोन कोटी रुपये खर्चून माणिकपुंज ते पालिका जलकुंभ दरम्यानची नवी जलवाहिनी आज पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली. आज या जलवाहिनीतून पालिका जलकुंभात पाणी पोहचले त्याचे लोकार्पण सौ. अंजूम कांदे यांच्या हस्ते झाले.

माजी नगराध्यक्ष अरुण पाटील, जी नगराध्यक्ष राजेश कवडे,काका सोळसे,चेतन पाटील,उद्योजक अनंत कासलीवाल, माजी नगरसेवक नितीन जाधव ॲड.सचिन साळवे, युवा सेना तालुकाप्रमुख सागर हिरे, शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव प्रकाश शिंदे, अयाज शेख, शशिकांत सोनवणे, विलास राजोळे, बद्रीनाथ सोनवणे, विद्याताई कसबे, भारती बागोरे, सीमा राजुळे,संगीता निकम, नीता दराडे, नेहा खटके, रिजवाना शेख, आदीं उपस्थित होते.

नांदगावसाठी तातडीची योजना म्हणून माणिकपुंज धरणातून अतिरिक्त स्वरूपात पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. मात्र धरण ते जलकुंभ पावेतो जलवाहिनीला नऊ किलोमीटर अंतरात अनेकदा गळत्या लागत असल्याने अपेक्षित दाबाने पाणी पुरवठा होत नव्हता.

आमदार सुहास कांदे यांनी वैशिट्यपूर्ण योजनेतून जलवाहिनी दुरुस्तीसाठी दोन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. चार किमी लोखंडी जलवाहिनीचे काम आज अखेरीला पूर्णत्वाला गेल्याचे सौ. कांदे यांनी सांगितले. मुख्याधिकारी शामकांत जाधव यांनी प्रास्ताविक केले.

‘गिरणा’च्या कामाला गती

नांदगावच्या पाणीपुरवठ्यासाठी आमदार सुहास कांदे यांनी पाठपुरावा केल्याने माणिकपुंजसाठी दोन कोटी तर गिरणा धरण योजनेसाठी पन्नास कोटी निधी मिळाले. सध्या गिरणाचेही काम जवळपास साठ टक्के इतके झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Protest: पातुर्डा येथे राज्यव्यापी हक्क परिषदेत शेतकरी नेते कडाडले

Agrowon Diwali Article: सुखी माणसाचा सदरा गवसतो तेव्हा...

Sugarcane Worker Issue: ऊस तोडणी कामगारांना फरक न दिल्यास संप

Development Project: मावळ तालुका कृषी विकासाचा आदर्श बनेल : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Kolhapur Jaggery Price: कोल्हापुरात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे, मिळाला 'इतका' भाव

SCROLL FOR NEXT