Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Onion : दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन खरीप लाल कांदा येणार बाजारात

Onion Market : खरीप हंगामात पावसाची प्रतीक्षा असल्याने जिल्ह्यातील पूर्व भागात खरीप लाल पोळ कांदा लागवडीवर परिणाम दिसून आला. पाऊस व पाण्याच्या उपलब्धतानुसार जुलैमध्ये शेतकऱ्यांनी कांदा बियाणे पेरणी तर काहींनी लागवडी केल्या होत्या.

Team Agrowon

Nashik News : खरीप हंगामात पावसाची प्रतीक्षा असल्याने जिल्ह्यातील पूर्व भागात खरीप लाल पोळ कांदा लागवडीवर परिणाम दिसून आला. पाऊस व पाण्याच्या उपलब्धतानुसार जुलैमध्ये शेतकऱ्यांनी कांदा बियाणे पेरणी तर काहींनी लागवडी केल्या होत्या. सुरुवातीच्या टप्प्यातील कांदा काढणीसाठी आला असून दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन खरीप लाल कांदा बाजारात येणार आहे. त्यानुसार काढणीसाठी लगबग सुरू होती. मात्र पावसामुळे कामात व्यत्यय आल्याची स्थिती आहे.

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर प्रमुख खरीप कांदा उत्पादक पट्टा असलेल्या चांदवड, देवळा, येवला, नांदगावसह सिन्नर तालुक्यात लागवडीवर परिणाम दिसून आला. मात्र जुलैमध्ये पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊन लागवडीचे नियोजन केले होते. मात्र पावसाने खंड पडल्यानंतर पुन्हा या लागवडींवर परिणाम झाला. त्यामध्ये मालेगाव, चांदवड, देवळा व येवला तालुक्यांत लागवडी झाल्या होत्या. तर काही शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर जोखीम घेऊन कांदा बियाणे पेरणी केली होती. हा कांदा आता काढणीयोग्य झाला आहे. मात्र पावसामुळे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

लागवडी दरम्यान पाऊस नसल्याने हंगाम काहीसा अस्थिर झाला. तर नंतर झालेल्या जोरदार पावसामुळे कांदा रोपांचे नुकसान झाले. तर काही भागात पाणीटंचाईचा परिणाम दिसून आला. तर आता झालेल्या मुसळधार पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कांद्याची प्रतवारी कमी झाली आहे. दरवर्षीच्या तुलनेत कांद्याची आवक दसऱ्याच्या मुहूर्तावर कमी होणार आहे.

दसऱ्याला होते नवीन कांद्याची आवक

प्रामुख्याने उमराणे, मुंगसे, देवळा, लासलगाव या बाजारात नवीन खरीप कांद्याची आवक दसऱ्याच्या मुहूर्तावर होत असते. दसऱ्यापासून नवीन कांद्याचे लिलाव सुरू होत असतात मात्र यंदा अनेक भागांत मुसळधार पावसामुळे कांदा काढण्याचे कामकाज अडचणीत आले आहे. त्यामुळे आवक कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या उन्हाळ कांद्याला ४१०० ते ४२०० रुपये दर मिळत आहे. त्यामुळे नवीन कांद्याला मुहूर्ताला किती दर मिळतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दसऱ्यादिवशी लाल कांदा विक्रीसाठी मुहूर्त असतो. या मुहूर्तावर दरवर्षी १०० ते १५० नगांची आवक होत असते. मात्र अगोदर पाऊस आल्याने नेमकी किती आवक होते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
श्रीपाल ओस्तवाल, मुख्य संचालक, श्री रामेश्वर कृषी मार्केट, उमराणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT