Vegetables Rate agrowon
ॲग्रो विशेष

Vegetables Rate : नवीन पीक बाजारात; भाजीपाला झाला स्वस्त, लसूण, कांद्याला चांगला दर

sandeep Shirguppe

Kolhapur Vegetable Market : वांगी, भेंडी, दोडका, वरणा, गवार, घेवडा, आदी नवीन पीक आल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. त्यामुळे दरही अगदी आवाक्यात आले आहेत. मेथी, शेपू, पालक, पोकळा, कांदापात स्वस्त झाली आहे. लसूणचा प्रतिकिलोचा दर २४० ते २८० रुपये असा, तर कांदा, बटाटा चाळीशी पार पोहोचला आहे. टोमॅटोचा भाव पंधरा ते वीस रुपये प्रतिकिलो असा पडला आहे.

गेले दोन आठवडे पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे नवीन आलेली पालेभाजी, फळभाज्या तोडीस शेतकऱ्यांना उसंत मिळाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तोड झाल्याने तितक्याच प्रमाणात मालाची बाजारात आवक झाली आहे. घाऊक दरातही घसरण झाल्याने सहाजिकच किरकोळ विक्रीचे भाव घसरले आहेत.

विशेषतः वांगी, दोडका, भेंडी, वरणा चाळीस ते साठ रुपये प्रतिकिलो अशा भावाने आज आठवडा बाजारात विक्री झाली. मका कणीस (स्वीट कॉर्न) चीही आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. एरवी १० ते १५ रुपये प्रति कणसाचा दर आज पाच ते सात रुपये प्रतिनग असा पडला होता. लिंबूचेही दर दहा रुपयास पाच ते सहा नग इतका दर खाली आला आहे.

भाजीपाल्याचे दर (प्रतिपेंडी रुपयांत)

मेथी १५ ते २०, कांदापात १०, शेपू १०, पालक १०, पुदिना ५, कोथिंबीर १०, अंबाडा ५, आळू ५, पोकळा १०.

फळभाज्यांचे किलोचे दर (रुपयांत)

भेंडी ४०, कोबी १५ ते २५ रू. नग वांगी ४० ते ६०, मिरची ४० ते ६०, ओला वाटाणा ६० ते १००, दोडका ४० ते ६०, ढब्बू मिरची ४०, काकडी ४०, बिनीस ४०, गाजर ४०, पापडी शेंग ४० ते ५०, फ्‍लॉवर २० ते ३०, पडवळ १० ते २५ रु. नग, मुळा १० रु. नग, तोंदली ४०, भोपळा फोड १० रु. नग, गवारी ८० ते १००.

उपवासामुळे फळांना मागणी (दर प्रतिकिलो रुपयांत)

सफरचंद १०० ते ३००, मोसंबी १००, डाळिंब ६०, अननस ३० ते ५० रु. प्रतिनग, केळी ३० ते ८० रु. डझन, ड्रॅगन फ्रुट १०० ते २००, पपई ४० ते ६० रु. प्रतिनग, पेरू ८० ते १४०

दुग्धजन्य पदार्थांना मागणी वाढली

उपवासामुळे श्रीखंड, आम्रखंड, फ्रुटखंड, रबडी, बासुंदी, खवा, दुध, दही, आदी दुग्धजन्य पदार्थांना मागणी वाढली आहे. तसेच शाबुदाणा खिचडीमुळे शाबुदाणा, शेंगदाणे, वरी, राजगिरी, बटाटा, रताळे, खजुराला मागणी वाढली आहे.

लसूण प्रतिकिलो २४० ते २८० रुपये

कांद्याचे किलोचे दर ४० ते ५० रुपये, तर लसूण प्रतिकिलो २४० ते २८० असा भाव खात आहे. दोन आठवड्यांपुर्वी लसूणचे किलोचे दर १२० ते १६० रुपये प्रतिकिलो असे होते. पावसाने जशी उघडीप दिली तशी हे दर महागले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Anudan : दूध अनुदानात २ रुपयांची वाढ पण शेतकऱ्यांऐवजी दूध संघांचा फायदा

Crop Damage : तासगाव तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा

Onion Seed : रब्बी कांदा बियाण्याची चढ्या दराने विक्री

Rain Update : सांगली जिल्ह्यात सरासरीच्या १७३.८ टक्के पाऊस

Satara Rain : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT