Kolhapur Coopertive Societies : सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभा महिन्याअखेरीस, मंजूर, नामंजूरने सभा गाजणार

KDCC Bank General Sabha : ३० ऑगस्टला जिल्हा दूध संघ 'गोकुळ'ची, तर ३१ ऑगस्टला जिल्हा मध्यवर्ती बँकेची (केडीसीसी) वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे.
Kolhapur Coopertive Societies
Kolhapur Coopertive Societiesagrowon
Published on
Updated on

Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे मोठ्या प्रमाणात असल्याने सप्टेंबर महिना वार्षिक सर्वसाधारण संभानी गाजत असतो. यंदा विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असल्याने सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा आचारसंहितेचा कारणास्तव १५ दिवस आदी घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील लहान मोठ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहेत.

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या सभा ३० ऑगस्ट आणि ३१ ऑगस्ट रोजी मंजूर मंजूर तर विरोधकांकडून नामंजूर अशा घोषणांनी गाजण्याची शक्यता आहे.

३० ऑगस्टला जिल्हा दूध संघ 'गोकुळ'ची, तर ३१ ऑगस्टला जिल्हा मध्यवर्ती बँकेची (केडीसीसी) वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. गोकुळच्या सभेत बोरवडे शीतकरण केंद्र व सॅटेलाईट डेअरी (उदगाव) येथील लगतची जागा खरेदी करण्यास मंजुरी घेण्यासोबतच इतर महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत. तसेच जिल्हा बँकेत पोटनियम दुरुस्तीसह बाहेरील कर्ज उभारणी मर्यादा निश्चित करण्यासह इतर विषय सभेपुढे असणार आहेत.

सहकारातील दोन प्रमुख संस्थांसह पतसंस्था, बँकांच्याही आयोजन आहे. सहकार संस्थांच्या नियमानुसार ३० सप्टेंबरअखेर वार्षिक सर्वसाधारण सभा घ्याव्या लागतात. त्यानुसार जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ३० ऑगस्टला होत आहे.

पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीमधील महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यावर दुपारी एक वाजता सभा होणार आहे. एकूण बारा विषय अजेंड्यावर आहेत. त्यांपैकी जागा खरेदीसह पोटनियमांतील बदलास मंजुरी, डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय हे चर्चेचे विषय ठरू शकतात.

तसेच केडीसीसीची ८६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ३१ ऑगस्टला दुपारी १२ वाजता कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये होत आहे. सभेसमोर दहा विषय असणार असून बँकेच्या पोटनियम ३.३. मध्ये सुधारण्यासह इतर विषय असणार आहेत.

Kolhapur Coopertive Societies
KDCC Bank Kolhapur : जिल्हा बँक वाटणार २६ कोटींचा लाभांश, साडेसहा लाख शेतकऱ्यांना फायदा

अहवालाच्या मुखपृष्ठाचे वेगेळेपण

जिल्हा बँकेच्या अहवालावरील मुखपृष्ठावर बँकेची डिजिटल वाटचाल छायाचित्राच्या माध्यमातून दाखविली आहे. कोल्हापूरचा सुपूत्र असलेल्या स्वप्नील सुरेश कुसाळे यांच्या छायाचित्राला विशेष स्थान दिले आहे. पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये ५० मीटर एकर रायफल प्रकारात 'कास्यपदक' मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. गोकुळच्या अहवालाचे मुखपृष्ठाचेही वेगळे वैशिष्ट्य आहे. २०२३-२४ हे वर्ष 'वैरण विकास वर्ष' म्हणून साजरे केले आहे. त्याचा संदर्भ देऊन मुखपृष्ठ बनविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com