Banana Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : भाजीपाल्याची वाढ खुंटली; नवीन बागा वाळल्या

Banana Crop : पाणीटंचाईचे सावट असताना आता अति उष्णतेचा फटका भाजीपाला, फळपिकांना बसतो आहे. तापमान ४० अशांच्या पुढे गेले आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट असताना आता अति उष्णतेचा फटका भाजीपाला, फळपिकांना बसतो आहे. तापमान ४० अशांच्या पुढे गेले आहे. यामुळे अपेक्षित फुटवा मिळत नाही. फुलगळ कळी गळ, पिकांची वाढ खुंटली आहे.

त्यामुळे भाजीपाल्याच्या उत्पादन ६० टक्के घट होण्याची शक्यता आहे. तसेच वाढत्या तापमानामुळे दोन महिन्यांपूर्वी लागवड केलेली केळीची रोपेही वाळू लागली आहेत. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या अति उष्णतेमुळे अडचणी वाढल्या आहेत.

सांगली जिल्ह्यात सर्वसाधारणपणे ५ हजार हेक्टरवर भाजीपाला, केळी आणि फळांची लागवड केली जाते. वाळवा, मिरज, कडेगाव, पलूस, विटा, पाच तालुके भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यासाठी अग्रेसर आहेत. गेल्या पाच ते सहा वर्षांत तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत यादुष्काळी पट्ट्यातही भाजीपाला लागवड वाढली आहे.

शिराळा तालुक्यातही अलीकडच्या काळात शेतकरी भाजीपाला करू लागले आहेत. तुंग, दूधगाव, कवठेपिरान या गावांनी ढोबळी मिरची, वांगी अशी पिके घेऊन एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावले आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होऊ लागली आहे. ३९ अंशांपासून ते ४१ अंशांपर्यंत तापमान पोहोचले आहे. यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. मुळात अगोदरच पाण्याची टंचाई असताना शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर भाजीपाल्याची लागवड केली.

त्यातच आता अति उष्णतेचा फटका भाजीपाला, फळ पिकांवर बसू लागला आहे. पाणीटंचाई वाढते तापमान असे दुहेरी संकट शेतकऱ्यांवर आले आहे. तापमानामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. अपेक्षित फुटवा मिळत नाही. फुलकळी निघण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. तर काही भागात फुलगळीची समस्याही उद्‍भवली आहे.

अनेक भागांत टोमॅटो, वांगी, ढोबळी मिरची या पिकांची लागवड केली आहे. ही पिके सध्या काढणीच्या अवस्थेत आहेत. परंतु वाढत्या उन्हामुळे फळांवर सनबर्निंग प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यादेखत वाया जावू लागले असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.

कृष्णा आणि वारणा काठच्या शेतकऱ्यांनी नदीच्या पाण्यावर भाजीपाला लागवड करण्याचे नियोजन केले. त्यानुसार रोपवाटिकेत रोपे तयार करण्यासही सांगितली. परंतु एकंदर यासाऱ्या संकटामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड करण्याचे थांबवले आहे.

केळी उत्पादक हवालदिल

जिल्ह्यातील आष्टा, वाळवा, तुंग, यासह कडेगाव, विटा परिसरांत केळीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या भागातील शेतकऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वी केळीची लागवड केली आहे.

परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून दिवसेंदिवस तापमानात वाढ झाली. यामुळे दोन महिन्यांच्या असणाऱ्या केळीच्या बागा जागीच वाळू लागल्या आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

उष्णतेमुळे पिकांवर होणारा परिणाम

- मर रोगाचे प्रमाण वाढले.

- फुल, फळधारणा कमी.

- फळांची संख्या कमी, वजन वाढत नाही.

- एका आकाराची फळ येत नाही.

- साल पातळ राहून टिकवण क्षमता राहतही नाही.

- त्यामुळे अपेक्षित दर मिळत नाही.

दोन महिन्यांपूर्वी ३१०० केळी रोपांची लागवड केली. अति उष्णतेमुळे बाग संकटात आली आहे. यातून वाचविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु १०० रोपे वाळून गेली आहेत.
- प्रशांत शिंदे, केळी, उत्पादक शेतकरी, आष्टा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Marriage Problems: ग्रामीण भागातील लैंगिक कोंडमारा

Interview with IAS Varsha Ladda Untwal: मनुष्यबळाचा प्रश्‍न सोडविण्याला पहिले प्राधान्य

Agriculture Loan Waiver: शेतकऱ्यांची राजकीय ताकद उभी राहील का?

Wildlife Crop Damage Compensation: वन्यप्राण्यांमुळे पीक नुकसानीची भरपाई कशी मिळते?

Weekly Weather: हलक्या, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT