Millet Agrowon
ॲग्रो विशेष

Millet Revolution : भरडधान्य क्रांती घडवायला हवी

Millet Diet : आज ज्यांना शक्य आहे त्यांनी भरड धान्य, तृणधान्य, प्रोटीनयुक्त पदार्थ यांचे प्रमाण आपल्या आहारात वाढवले पाहिजे.

Team Agrowon

Millet Crop : भारतीय लोकांची ढेरी (Indian Potbelly) हा सध्या जगभर कुतूहलाचा विषय झाला आहे. भारतात लठ्ठपणाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत आहे. त्याचबरोबर वरवर साधारण शरीरयष्टी दिसणाऱ्या लोकांच्याही पोटाभोवती चरबी साठलेली दिसते आणि त्यांचे पोट माठासारखे दिसते. या लक्षणांवर काही थियरीज आल्या आहेत. यातील एक महत्त्वाची थियरी म्हणजे भारतीय लोकांचे प्रमाणाबाहेर कार्बोहायड्रेट्सचे सेवन आणि प्रोटीनयुक्त आहाराची कमतरता.

आपल्या आहारात कार्बोहायड्रेट आणि प्रोसेस केलेले कार्बोहायड्रेट यांचे प्रमाण गरजेपेक्षा खूप अधिक आहे. त्यात साखर, गहू आणि तांदूळ यांचे प्रमाण लक्षणीय आहे. जास्त कार्बोहायड्रेट आणि कमी प्रोटीन हे पोटाचा घेर वाढण्यामागचे मुख्य कारणे सांगितले जातात.

भारतीय लोक इतके जास्त कार्बोहायड्रेट का खात आहेत? भारताच्या स्वातंत्र्यानंतर सर्वांना पुरेल इतके अन्नधान्य भारतात पिकत नव्हते. ही कमतरता भरून काढण्यासाठी हरितक्रांती घडवून आणण्यात आली. हरितक्रांती गहू आणि तांदूळ यांच्या जास्त उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करण्यात आल्या.

अन्नसुरक्षेसाठी गहू आणि तांदूळ यांचे उत्पादन वाढविण्यासाठी जास्त प्रयत्न झाले, कारण ते अधिक काळ साठवता येतात, एका ठिकाणाहून दूरच्या ठिकाणापर्यंत त्यांची वाहतूक करता येते, त्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणे (मास प्रोडक्शन) तुलनेने सोपे आहे.

उपासमारीने मरणाऱ्या भारतीयांसाठी तातडीचा उपाय (क्विक सोल्युशन) म्हणून कार्बोहायड्रेट जास्त असलेले गहू आणि तांदूळ हे त्या काळासाठी सोपे आणि सहज उत्तर होते. आणि तसे झाले सुद्धा. भारताच्या भुकेचा प्रश्न सोडविण्यात हरितक्रांतीला यश मिळाले. इतकेच काय भारत गहू, तांदूळ निर्यात करू लागला.

परंतु दुसऱ्या टोकाला जाऊन हरितक्रांतीद्वारे कार्बोहायड्रेटयुक्त गहू, तांदळाचे उत्पादन वाढवून भारतीयांचे पोट भरण्याचा प्रयत्न हा जणू काही भारतीयांचे आरोग्य खराब करण्यासाठीचा प्रयत्न होता, असे भ्रामक चित्र उभे करण्याचा काही नाठाळ लोक प्रयत्न करत असतात. पण त्यात काही तथ्य नाही.

हरितक्रांती घडवून गहू, तांदळाचे उत्पादन वाढवणे हे ४०-५० वर्षांपूर्वी योग्य असलेले उत्तर होते. ते आज जसेच्या तसे लागू असण्याचे काहीच कारण नाही. आजच्या काळात परिस्थिती बदलली असून सरकारने नवे उत्तर शोधणे अपेक्षित आहे. सरकारदरबारी सध्या भरडधान्य, तृणधान्य यांचे सेवन वाढण्यासाठी काही प्रयत्न होत आहेत. ते प्रयत्न सतत चालू ठेवणे गरजेचे आहे. परंतु केवळ जाहिराती, प्रचार याच्या पलीकडे जाऊन हरितक्रांतीसारखे ठोस प्रयत्न होणे गरजेचे आहे.

भारताला भरडधान्य क्रांती घडवून आणावी लागेल. मागे नव्वदच्या दशकात, ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे' ही जाहिरात सरकारच्या प्रयत्नातून येत असे. पोल्ट्रीच्या उद्योगाला चालना देण्याच्या सरकारच्या धोरणाचा तो एक छोटासा भाग होता. असे प्रयत्न सातत्याने होणे गरजेचे आहे. मध्यान्ह भोजन योजनेत शाळकरी मुलांना अंडी देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. तो भारतभर राबवला पाहिजे.

आजही आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या काही वर्गाला कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी करता येईल. पण हे अतिकार्बोहायड्रेट आपल्या फूड कल्चरचा भाग होत आहेत. हरितक्रांतीपूर्वी नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले भरडधान्य हे ‘कॉमन फूड सोर्सेस’ होते. लोकांच्या दैनंदिन आहाराचा ते भाग होते. पण सगळ्या आर्थिक वर्गांतील लोकांना पोटभर अन्न देण्यासाठी ते पुरेसे नव्हते. आज ज्यांना शक्य आहे त्यांनी भरड धान्य, तृणधान्य, प्रोटीनयुक्त पदार्थ यांचे प्रमाण आपल्या आहारात वाढवले पाहिजे.

(लेखक आर्थिक विषयांचे अभ्यासक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Officer Threat: सभापतींच्या कार्यालयातील कृषी अधिकाऱ्याच्या धमकीने खळबळ

Symbiosis University: पुणेकरांच्या साक्षीने ज्ञानयोग्याचा सन्मान

Agri Reforms: राष्ट्रीय बाजारतळ उभारणीसाठी अधिनियमात होणार सुधारणा

Banana Export: माळशिरसमधून दररोज १० टन केळीची निर्यात

Sustainable Agriculture Day: डॉ. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस शाश्‍वत शेती दिन

SCROLL FOR NEXT