Millet Crop: वरईची शेती कशी करावी?

Varai Veriety: वरई भगर सर्वात उच्च प्रतीची मानली जाते आणि या वरई भगरीलाच बाजारभावही चांगला मिळतो. तर, कोद्रा भगर सगळ्यात हलक्‍या प्रतीची समजली जाते आणि बाजारभावही कमी मिळतो.

Millet Sowing: एक ते दीड मीटर रुंद, ८ ते १० सेंटीमीटर उंच आणि उतारानुसार लांबी ठेवून गादी वाफे तयार करावेत. ७ ते ८ सेंटीमीटर अंतरावर ओळीत १ ते २ सेंटीमीटर खोल बियाणे पेरून झाकावे. पेरणीपूर्वी आणि पेरणीनंतर प्रति गुंठा एक किलो युरिया द्यावा. अशा पद्धतीने लागवड केल्यास ३० ते ३५ दिवसांत रोपे लागवडीसाठी तयार होतात. ५ ते ७ गुंठे क्षेत्रावर केलेल्या रोपवाटिकेतील रोपे एक हेक्‍टर क्षेत्र लागवडीसाठी पुरेशी होतात. मुख्य शेतात लागवड करताना दोन ओळीत २५ सेंटीमीटर आणि दोन रोपांत १० सेंटीमीटर अंतर ठेवून लागवड करावी. पेरणीसाठी सुधारित जातींचा वापर करावा. सुधारीत जातीमध्ये  के-१  ही हलक्‍या जमिनीत येणारी मध्यम उंचीची हळवी जात आहे. तर जीपीयूपी-२१ ही जात मध्यम जमिनीत कमी ते मध्यम पावसात येणारी निमगरवी जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com