Dr. Sharad Gadakh Agrowon
ॲग्रो विशेष

Ideal Village : आदर्श गावासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज ः कुलगुरू डॉ. गडाख

Team Agrowon

Akola News : सध्या शहरीकरणाकडे वाढलेला युवक-युवतींचा ओढा थांबवण्यासाठी ग्रामीण भागात उत्पादित होणाऱ्या शेती आणि शेतीपूरक उत्पादनांवर तेथेच प्रक्रिया करणे गरजेचे आहे. प्रत्येक गाव आदर्श होण्यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी संस्थांनी एकात्मिक प्रयत्न करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शरद गडाख यांनी केले.

विद्यापीठाच्या शिक्षण विस्तार संचालनालयातर्फे ‘विदर्भस्तरीय महिला सक्षमीकरण मेळावा व स्त्रीशक्ती उत्सव’ प्रसंगी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

या वेळी वाशीम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ.सुरेंद्र काळबांडे, उद्यानविद्या अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई, रिलायन्स फाउंडेशनचे राज्यसमन्वयक सचिन महातळे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रेरणा चिकटे यांनी तर आभार कृतिका गांगडे यांनी मानले. विस्तार शिक्षण संचालनालयातील डॉ. उमेश चिंचमालातपुरे, डॉ. सुहास मोरे, प्रा.प्रकाश घाटोळ, प्रा. संजीवकुमार सलामे, दीपक येलकर, दिलीप तिरपुडे, सुमिता राठोड, बाळकृष्ण झगरे, ओंकार सोनकर, उमेश मोहोड, योगेश मानकर, अजय माहोरे, नरेश डोंगरे यांनी पुढाकार घेतला.

या महिलांना केले सन्मानित

कुसुमताई झाडे (मु.पो. सिंधी रेल्वे ता. जिल्हा वर्धा), वर्षा लांजेवार (मु.पो.चिंधीचक ता. नागभीड जि.चंद्रपूर), दुर्गा सोनवणे (मु.पो. सुलज ता. जळगाव जामोद जि. बुलडाणा), प्रिया गेडाम (मु.पो.कुकदीपानजरा, ता. काटोल, जि.नागपूर), तृप्ती महाले (मेहकर जि.बुलडाणा), दुर्गा वर्मा (मु.पो.ता. जि.गोंदिया), श्रीमती साधना सराड (मु.पो.सारफळी, ता. बाभुळगाव, जि. यवतमाळ), मोनिका विंचुरकर (अमरावती), अंजली डोरले (मु.पो. भोजापुर, ता.जि. भंडारा), विजयमाला देशमुख (करडा, जि.वाशीम), कविता येवले (मु.पो.पाळोदी, ता. दारव्हा, जि.यवतमाळ), किरण लोहकरे (लोणी, ता. नांदगाव. जि. अमरावती), वंदना घावडे (जीवनगट्टा, ता. एटापल्ली, जि.गडचिरोली) व सुनीता ठाकरे (बार्शीटाकळी,जि. अकोला).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT